शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले 

By सुमेध वाघमार | Published: May 14, 2023 9:58 AM

पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे. 

नागपूर : मी डान्सबारमधून परत घरी जात होते. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो ऐकून थांबले. पाहिलं तर कचऱ्याच्या कुंडीजवळून आवाज येत होता. अवघ्या काही तासांचं बाळ तिथं होतं. त्याला घेऊन आम्ही पोलिस ठाण्यात गेलो. आणि तक्रार नोंदविली. त्या बाळाला नियमानुसार अनाथाश्रमात पाठविण्यात येणार होतं, पण काही तासांच्या सहवासाने माझ्यातली आई त्या चिमुकल्याने जागी केली होती. पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे. हे कथन आहे, आंचल वर्मा या ट्रान्स आईचे. आईचे हृदय असण्यासाठी केवळ स्त्रीच असले पाहिजे, असे नाही, याची साक्ष देणारे हे वास्तव नागपुरातलेच आहे. तिचे नाव आंचलने महालक्ष्मी ठेवले आहे. मुंबईतील महालक्ष्मी भागात ती आपल्याला मिळाली, तो मातेचा आशीर्वाद होता, अशी त्यांची श्रद्धा आहे.  जिथे आपल्याच आयुष्याचा ठावठिकाणा पुरेसा हाती आलेला नसताना, एका मुलीची जबाबदारी घेताना काय विचार होता, काय भावना होत्या, असं विचारलं असता, आंचल म्हणतात, जेव्हा मी तिला कुशीत घेतलं व तिचा तो मासूम चेहरा पाहिला, तेव्हाच माझ्या मनात काही तरंग उठले. तिला जीव लावावा असं वाटलं. तिला दुसऱ्या कुणाच्या हाती सोपविण्याचा विचारही सहन झाला नाही, म्हणून मीच तिला दत्तक घेतलं. 

मी लहानपणापासूनच तिला खूप प्रेम दिले. तिला कधीही रागावले नाही. कायमच समजावून सांगत राहिले. चांगले कोण, वाईट कोण, ‘गुड टच-बॅड टच’ शिकविले. महालक्ष्मीनेही मला तितकाच जीव लावला. - आंचल वर्मा 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेnagpurनागपूर