सावनेर : स्तनपान म्हणजे मातेचे दूध एवढा संकुचित अर्थ काढला जातो. आदर्श परिस्थितीत बाळ झाल्यावर, त्याचे मूलभूत मापदंड चांगले बघून त्याला मातेच्या छातीवर ठेवले पाहिजे. कारण मातेचे दूध बाळासाठी अमृत असते, असे प्रतिपादन अदानी फाउंडेशन प्रकल्पाच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी जयश्री काळे यांनी केले. अदानी फाउंडेशन सुपोषण प्रकल्पांतर्गत सुपोषण संगिनींच्या माध्यमाने एकात्मिक बालविकास योजना आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. स्तनपान संरक्षण एक सामाईक जबाबदारी या घोषवाक्याला आधार घेत, हा कार्यक्रम स्तनदा माता आणि गर्भवती महिलासाठी राबविण्यात येत आहे. याकरिता सावनेर तालुक्यातील ६० गावांत सुपोषण संगिनी घरोघरी जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. स्तनपान सप्ताहानिमित्त पोस्टर, घोषवाक्य स्पर्धा आणि चर्चासत्राचे आयोजनही तालुक्यात करण्यात आले आहे.
070821\5943img-20210807-wa0080.jpg
प्रसंगी स्तनदा माता दिसत आहेत