लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जसे माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आणि मी मोठा झालो. तसेच, तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्या. मुलांच्या इच्छा मारू नका, त्यांच्यावर तुमच्या इच्छा लादू नका. माणूस घडवा आणि माणूस जगवा... असे तात्विक आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी आज येथे महिलांना केले.माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘आत्मनिर्भर नारी, कर्तृत्त्वाला सलाम’ या कार्यक्रमात प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असलेल्या भाऊ कदम यांनी सभागृहात उपस्थित महिलांशी संवाद साधताना, स्व:ताच्या प्रवासाचे विविध टप्पे उलगडले. तत्पूर्वी, भाऊ कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आ. मोहन मते, विष्णू मनोहर, डॉ. निलेश खोंडे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.विनोदाचे विविध पैलू उलगडून सांगताना, भाऊ कदम यांनी... मी कधीच अंत्ययात्रेला किंवा हॉस्पिटलमध्ये कुणाला भेटायला जात नाही. दु:खाच्या प्रसंगातही लोक माझ्याकडू बघून हसतात आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. मी स्वत:ही हॉस्पिटलमध्ये लोक माझ्यासोबत सेल्फी काढण्यास आतूर असतात, असे किस्से त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खास उपस्थित महिलांच्या आग्रहास्तव त्यांनी सभागृहातील महिलांसोबत ‘झिंग झिंग झिंग्गाट’ गाण्यावर नृत्य केले. त्यानंतर, त्यांनी ‘चंदन सा बदन’ हे गीत स्वत:च्या आवाजात सादर केले. यावेळी, श्रुती पांडवकर व काजल काटे यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे गीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निवेदनाची बाजू रूपाली मोरे, ज्योती भगत यांनी सांभाळली. प्रास्ताविक राज्य महिला आयोगाच्या सदस्या निता ठाकरे यांनी केले. यावेळी, प्रख्यात वक्त्या काजल राजवैद्य यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर उपस्थित होत्या.कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार याप्रसंगी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हेरिटेज कंझर्व्हेटिव्ह सोसायटीच्या सचिव लीना झिलपे, समाजसेविका नेहा जोशी, लघुउद्योजिका सुनंदा खोब्रागडे, लेखिका वर्षा ढोके-सय्यद, प्राणिप्रेमी स्मिता मिरे, अभिनेत्री काजल काटे व रूपाली मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
माता-भगिनींनो, संस्कारक्षम मुले घडवा आणि माणूस म्हणून जगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:36 PM
जसे माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आणि मी मोठा झालो. तसेच, तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्या. मुलांच्या इच्छा मारू नका, त्यांच्यावर तुमच्या इच्छा लादू नका. माणूस घडवा आणि माणूस जगवा... असे तात्विक आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी आज येथे महिलांना केले.
ठळक मुद्देआत्मनिर्भर नारींना भाऊ कदम यांचा सलाम