शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जन्मानंतर पहिल्यांदाच आईचा चिमुकलीला स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:54 PM

इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात चिमुकलीला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इकडे प्रसुती होत नाही तर तिकडे तिचे नमुने पॉझिटिव्ह आले. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून चिमुकलीला मातेपासून दूर ठेवले. सलग १५ दिवस ती चिमुकली मातेपासून दूर होती. त्या दोघीही एकमेकांसाठी आसुसल्या होत्या. आज मातेचे नमुने निगेटिव्ह आले, आणि पहिल्यांदाच मातेच्या हातात चिमुकलीला दिले. आईच्या पहिल्या स्पर्शाने चिमुकलीने स्मित केले, आईच्या डोळ्यात अश्रू तरळले तर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या चेहºयावर कर्तव्याचे समाधान पसरले.मोमीनपुरा येथील २६ वर्षीय महिला आपल्या एका नातेवाईकासोबत २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता मेयोच्या स्त्री रोग व प्रसुती विभागात भरती झाली. ‘रेड झोन’ वसाहतीमधील असल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. बुधवारी सकाळी ६.३० वाजता अचानक तिच्या पोटात दुखू लागले. तिला प्रसुती कक्षात नेले. सकाळी ७.३०वाजता नॉर्मल प्रसुती झाली. तिने मुलीला जन्म दिला. सुरक्षेचे साधने घालूनच डॉक्टरांनी ही प्रसुती केली. प्रसुतीनंतर १५ मिनिटांनी प्रसूत महिला पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली. यामुळे प्रसुती करणारे दोन डॉक्टर, दोन परिचारिका व दोन सफाई कर्मचाऱ्यांचे नमुने घेत त्यांना रुग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले. आईपासून चिमुकलीला कोरोना होऊ नये म्हणून डॉक्टरांनी तिला ‘एनआयसीयू’मध्ये ठेवले. प्रसूत मातेची बहीण आणि चिमुकलीची मावशी मदतीला आली. मातेचे दूध घेऊन ती ‘एनआयसीयू’मध्ये जाऊन चिमुकलीला चमच्याने पाजत होती. आईच्या स्पर्शासाठी आसुसलेली चिमुकली खूप रडायची. तिकडे कधी एकदा चिमुकलीला कुशीत घेते असे झाले होते. परतु डॉक्टर, परिचारका सर्वच तिला समजावत होते. तीही समजून घेत होती. अखेर १४ दिवस पूर्ण झाले. पहिल्या दिवशी तिचा नमुना निगेटिव्ह आला. २४ तासानंतर आज पुन्हा नमुना तपासण्यात आला. यातही ती निगेटिव्ह आली. तिच्या रुग्णालयातून सुटीचे पेपर तयार करण्यात आले. वॉर्डाबाहेर एक खुर्ची ठेवली. तिला बसविले. एका परिचारिकेने अलगद तिच्या हातात बाळ ठेवले. आईच्या स्पर्शासाठी आसुलेले बाळ स्मितहास्य करीत कुशीत शिरले, मातेच्या डोळ्यात अश्रू होते. या प्रसंगाने काही वेळेसाठी तिची मावशी, तिथे उपस्थित डॉक्टर, परिचारिक व आणि कर्मचारीही भावूक झाले होते.मातेपासून ती चिमुकली दूर असली तरी डॉक्टर, परिचारिकेची एक चमू तिच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होती. यात बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बोकडे, स्त्री रोग व प्रसुती विभागाचे डॉ. प्रशांत उईके, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. तिलोत्तमा पराते, कोविड वॉर्डात त्या मातेच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून असलेल्या मेडिसीन विभागाच्या प्रा.डॉ. मृणाल हरदास, मेट्रन साधना गावंडे आणि त्यांचा स्टाफ, आणि याचे नियोजन अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर