शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

मुलीच्या श्वासासाठी आईची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:57 AM

सहा वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईने बेशुद्धावस्थेतच धावपळ करीत रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून सिटी स्कॅन करण्यास सांगितले.

ठळक मुद्देमेयोतील प्रकार : सुवर्ण महोत्सवी वर्षातही स्थितीत बदल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा वर्षांच्या चिमुकलीला तिच्या आईने बेशुद्धावस्थेतच धावपळ करीत रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून सिटी स्कॅन करण्यास सांगितले. चिमुकलीच्या तोंडाला मास्क लावून आॅक्सिजन सिलिंडर नातेवार्इंकाच्या हातात दिले. आईने मुलीला कडेवर घेतले, दुसºयाने सिलिंडर ओढणे सुरू केले. जागोजागी पडलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सिलिंडर उसळत होते. तोंडावरील मास्क निघत होता. आईच्या जीवाची घालमेल होत होती. रुग्णाच्या श्वासाची ही धडपड मेयोसाठी नवीन नाही. सुवर्ण महोत्सवी वर्षात हे रुग्णालय पदार्पण करीत असतानाही रुग्णालयाच्या स्थितीत जरासाही बदल झालेला नाही, हे धक्कादायक वास्तव आहे.१८६२ मध्ये ‘सिटी हॉस्पिटल’च्या नावाने सुरू झालेला धर्मदाय दवाखाना आज ‘मेयो’च्या नावाने विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमानुसार एकाच ठिकाणी सर्व अद्ययावत सोयी असणे आवश्यक असताना या रुग्णालयातील विविध विभागांच्या इमारती विखुरल्या आहेत.इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्सची प्रतीक्षारुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेन्डन्सचीही महत्त्वाची भूमिका असते. परंतु मेयोत या दोन्ही गोष्टींची वानवा आहे. यातही स्ट्रेचर ब्रिटिशकालीन आहेत. दोन चाकांचे हे स्ट्रेचर राज्यात केवळ मेयोमध्येच दिसून येते. या स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला १०० मीटरचे अंतर कापणेही कठीण जाते. यातच रस्त्यावरील जागोजागी असलेले खड्डे आजाराचे दुखणे आणखी वाढविते. याला घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर लाखो रुपये खर्चून नऊ ई-रिक्षा घेतल्या. यातील तीन रिक्षांमध्ये रुग्णांना झोपवून नेण्यासाठी ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’चे स्वरूप दिले. परंतु अद्यापही या रिक्षा रुग्णसेवेपासून दूर आहेत.