नागपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २३ एप्रिल २०२१ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या आदेशान्वये सातवा वेतन आयोग लागू केला; पण दिव्यांग शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ अजूनही मिळालेला नाही. त्यासाठी वेतन निश्चिती शिबिर घेण्याची गरज आहे. ऑनलाईन टॅब जनरेट करण्याची गरज आहे. यासाठी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक बाबीसाठी अडवणूक होत असल्याने दिव्यांग शाळेच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यासाठी दिव्यांग शाळा-कर्मशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयापुढे आंदोलन केले. आमदार नागो गाणार, प्रमोद रेवतकर, राजेश हाडके, उमेश वारजूकर, लोकेश चोले, सुनील शेंडे, राजेंद्र आघाव, प्रभाकर पांडे, मोहन परसोडकर, कविता पिल्ले यांनी उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांना निवेदन दिले.
दिव्यांग शिक्षकांचे सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:10 AM