लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशामध्ये स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे यांनी रविवारी संविधान हक्क परिषदेमध्ये बोलताना केली.सीताबर्डीतील सांस्कृतिक बचत भवन येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कमिटीचे राष्ट्रीय सल्लागार भदंत प्रियपाल यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सचिव भदंत हर्षबोधी, भदंत शीलकीर्ती, भदंत कुणालकीर्ती, भदंत मोगलायन, भदंत कमाल धम्मो, अॅड. अर्चना गौतम, विजय बौद्ध, अॅड. एच. एल. राजे, डॉ. आर. एल. कानडे, दयासागर बौद्ध प्रमुख अतिथी होते.जगप्रसिद्ध महाबोधी महाविहाराला ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यघटनेतील अनुच्छेद २५(२) मध्ये दुरुस्ती करून स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करावा लागेल. त्याकरिता आयोजित आंदोलन बेमुदत स्वरुपाचे आहे. बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा लागू होतपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. हा आरपारचा लढा आहे असे खैरे यांनी सांगितले.अन्य मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. परिषदेत १५ राज्यातील दोन हजारावर बौद्ध प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी अतिथींचे स्वागत केले. प्रा. अशोक वानखेडे यांनी प्रास्ताविक तर, हंसराज शेंडे व प्रा. प्रमोद मेश्राम यांनी संचालन केले. सुनील जांभुळकर यांनी आभार मानले. धनराज धोपटे, बबनराव लव्हात्रे, प्रदीप फुलझेले, विशाल गोंडाणे, चंद्रमणी सहारे, चांगो बोरकर, मनोहर हेंडवे, सुरेश गोटेकर, वर्षा वाघमारे, मधुकर मेश्राम आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
स्वतंत्र बौद्ध कायद्यासाठी मार्चमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:08 AM
देशामध्ये स्वतंत्र बौद्ध कायदा लागू करण्यासाठी येत्या १३ मार्च रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉचे .....
ठळक मुद्देमुकुंद खैरे : राष्ट्रीय संविधान हक्क परिषद