शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

कोरोनाच्या प्रादूर्भावात परिचारिकांचे आंदोलन; काळ्या फिती बांधून देत आहेत रुग्णसेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 9:04 PM

कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या मेयो, मेडिकलच्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देएक दिवसाचा लाक्षणिक संप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात घालून सेवा देत असलेल्या मेयो, मेडिकलच्या परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन संपाचा इशारा दिला आहे. आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून रुग्णसेवा देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावात परिचारिकांच्या या आंदोलनाने शासनाची चिंता वाढवली आहे.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये हे आंदोलन केले जात आहे. नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये साधारण दीड हजारावर परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. संघटनेनुसार, परिचारिकांच्या मागण्यांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करीत आले आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी दोन तास कामबंद आंदोलन केले. १ ते ७ सप्टेंबरपर्यंत काळ्या फिती बांधून परिचारिका सेवा देणार आहेत. त्यानंतरही मागण्यांवर विचार न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला जाईल. हे आंदोलन अध्यक्ष डॉ. सुमन टिळेकर, संघटनेच्या वरिष्ठ कार्याध्यक्ष प्रभा भजन, सरचिटणीस कमल वायकोळे, कार्याध्यक्ष इंदुमती थोरात, विभाग कार्याध्यक्ष वर्षा पागोटे यांच्या नेतृत्वात होत आहे.-या आहेत मागण्या::राज्यातील सर्व स्तरातील परिचारिकांची सहा हजार रिक्त पदे भरण्यात यावीत.:: कोविड रुग्णसेवेत असणाऱ्या परिचरिकांना सात दिवस ड्युटी व सात दिवस क्वारंटाइन करण्यात यावे.:: रुग्णसेवा देणाºया परिचारिकांना एन ९५ मास्कसह सुरक्षिततेची साधने पुरविण्यात यावीत.:: जुनाट आजार असलेल्या परिचारिकांची ड्युटी कोविड हॉस्पिटलमध्ये लावू नये.:: कोविड हॉस्पिटलमध्ये परिचारिकांची ८ तासांऐवजी ४ तासांची ड्युटी लावावी.:: कोविड रुग्णांना सेवा देत असताना परिचारिकेचा मृत्यू झाल्यास ५० लाखांचा विमा व वारसांना अनुकंपा तत्त्वाखाली शासकीय सेवेत नोकरी द्यावी.:: परिचारिकांच्या कुटुंबासाठी रुग्णालयात राखीव जागा ठेवावी.:: परिचरिकांना ३०० रुपये डेली अलाऊन्स देण्यात यावा.:: कोविड रुग्णांच्या सेवेत असलेल्या परिचारिकांच्या अडचणी सोडवून घेण्यासाठी शासनस्तरावर समिती गठित करावी.

 

टॅग्स :agitationआंदोलन