लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ यंदा शहराच्या चहू बाजूंना रंगणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रम शहराच्या प्रमुख स्थळांवर आयोजित करण्यात येत आहेत.महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, यातील प्रमुख कार्यक्रम हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या पटांगणात होतील. गेल्या दोन महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदा हा महोत्सव २९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २९ नोव्हेंबरला धार्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या ‘सूर-ताल संसद’ या कार्यक्रमाद्वारे होईल. महोत्सवादरम्यान दररोज सांस्कृतिक क्षेत्रात शहराचे नाव उंचावणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येईल. महोत्सवातील ९ ते ११ डिसेंबर दरम्यानचे कार्यक्रम पूर्व, पश्चिम, दक्षिण पश्चिम भागात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक आ. अनिल सोले यांनी दिली. महोत्सवात २९ नोव्हेंबरला श्री श्री रविशंकर यांचा एक हजार कलावंतांच्या सहभागाचा ‘सुर-ताल संसद’, ३० नोव्हेंबरला ललित दीक्षित यांचा ‘साधना सरगम’, १ डिसेंबर रोजी सुरेश वाडकर यांचे सुगम संगीत, ३ ते ५ डिसेंबर दरम्यान ‘रणरागीणी राणी लक्ष्मीबाई महानाट्य’, ६ डिसेंबरला शैलेश बागडे यांचे ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ महानाट्य, ७ डिसेंबरला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेक अभिनेता शैलेश लोढा यांच्या नेतृत्वात कविसंमेलन, ८ डिसेंबरला ‘लता म्युझिकल कॉन्सर्ट’... हे सर्व कार्यक्रम ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या पटांगणात होतील.तर, ‘लता म्युझिकल कॉन्सर्ट’ हा कार्यक्रम भेंडे ले-आऊट येथे ९ डिसेंबरला, १० डिसेंबर रोजी बगडगंज येथील कच्छी विास मैदानात होईल. ११ डिसेंबरला ‘आनंद वन भुवनी’ हा कार्यक्रम रामनगर मैदानात पार पडेल. त्यानंतर, पुन्हा ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या पटांगणात १२ डिसेेंबर रोजी महानाट्य ‘महारथी कर्ण’, १३ डिसेंबर रोजी ‘युगपुरूष स्वामी विवेकानंद’ संगीत नाट्य, १४ डिसेंबर रोजी जावेद पाशा यांच्या चमूचा ‘मिरेकल ऑन व्हिल्स’ हे कार्यक्रम सादर होतील. महोत्सवाचा समारोप १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ‘माँ गंगा’ या नृत्य नाटिकेने होणार असल्याचे सोले यांनी सांगितले. यावेळी, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. गिरीश व्यास, मोहन मते, विकास कुंभारे, माजी आ. सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, प्रवीण दटके, राजेश बागडी उपस्थित होते.
नागपूर शहराच्या चहू बाजूंना रंगणार खासदार सांस्कृतिक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:43 PM
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ यंदा शहराच्या चहू बाजूंना रंगणार आहे. महोत्सवातील विविध कार्यक्रम शहराच्या प्रमुख स्थळांवर आयोजित करण्यात येत आहेत.
ठळक मुद्दे२९ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत बहुढंगी कार्यक्रमज्येष्ठ कलावंतांचा होणार सन्मान