लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीतील कुख्यात माया गँगचा म्होरक्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, कुख्यात गुंड स्वप्निल सुभाष साळुंखे याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले. कुख्यात साळुंखे सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमध्ये राहतो. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्या विरुद्ध पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई करून त्याला कारागृहात डांबले होते. तो बाहेर आला आणि परत गुन्हेगारीत सक्रिय झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र त्याची गुन्हेगारी सुरूच आहे.गुन्हेगारी करणे, खंडणी वसूल करणे, धमक्या देणे खुनाचा प्रयत्न हाणामाऱ्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग असून बुकी राज अलेक्झांडर त्याच्याकडून त्याने मार्च महिन्यात २ कोटी ३६ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याला एमपीडीए लावून कारागृहात डांबण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी साळुंखेविरुद्ध एमपीडीएच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्याला कारागृहात डांबण्यात आले आहे.पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्या कार्यकाळात झालेली ही एमपीडीएची ५१ वी कारवाई ठरली आहे.
कुख्यात स्वप्निल साळुंखेविरुद्ध एमपीडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:41 AM
अजनीतील कुख्यात माया गँगचा म्होरक्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, कुख्यात गुंड स्वप्निल सुभाष साळुंखे याच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला कारागृहात डांबण्यात आले.
ठळक मुद्देटोळीचा सूत्रधार : अनेक गंभीर गुन्हे दाखल