नागपूर : मध्य प्रदेश शासनाच्या ग्रामोद्योग विभागातर्फे आयोजित हस्तशिल्प व हॅण्डलूमच्या वस्तूंचे मृगनयनी मध्य प्रदेश प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दि. १२ फेब्रुवारीपासून सुरू असून, नागपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रविवार, २१ फेब्रुवारी सेलचा अखेरचा दिवस आहे. प्रदर्शनात ४२ कलाकारांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे चंदेरी व महेश्वरी प्रदर्शित केले आहे. उत्सवाच्या प्रमुख आकर्षणात १९३०च्या दशकात निर्मित डिझायनर चंदेरी साड्या व देवी अहिल्याबाई होळकर घराण्यांमध्ये प्रचलित डिझाइनच्या महेश्वर साड्या व अन्य मनमोहक हस्तशिल्क, चांदीचे पशुपतीनाथ, भगवान शिवच्या मूर्ती आदी प्रमुख आकर्षण आहे. यासह वनस्पती रंगात रंगलेल्या वाटिका, बाग इंडिगो व ब्लॉक प्रिंट आहेत. टिकमगड येथील पंचधातूच्या मूर्ती व बैतूल जिल्ह्यातील आदिवासी शिल्प विशेष आहेत. कारागिरांनी वाराणशीचे मुगा कोसा टसर आणले आहेत. शिल्पकलेला प्रोत्साहन देण्याचा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे मध्य प्रदेश हस्तशिल्क व हतकरघा विकास निगम, भोपाळचे प्रभारी प्रदर्शन रिजनल मॅनेजर एम. एल. शर्मा यांनी सांगितले. (वा.प्र.)
मृगनयनी मध्य प्रदेश सेलचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:12 AM