शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

महामार्गांवर मृत्युंजय दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे जीव वाचविण्याच्या उद्देशाने राज्यात मृत्युंजय दूत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे जीव वाचविण्याच्या उद्देशाने राज्यात मृत्युंजय दूत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, येत्या १ मार्चपासून राज्यातील महामार्गांवर ठिकठिकाणी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी हे देवदूत उभे असलेले बघायला मिळणार आहे.

देशात दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी मदत मिळत नसल्याने बऱ्याचशा जखमींचा मृत्यू होते, असे एका अहवालातून पुढे आले आहे. अपघात झाल्यानंतर बरेच वेळा जखमी रस्त्यावर विव्हळत असतो. आजूबाजूची मंडळी हे सर्व बघत असतात. परंतु, उगाच पोलिसांच्या कारवाईचे लचांड मागे लागू नये म्हणून जखमीला मदत करण्यास अनेक जण धजावत नाहीत. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन जखमींना तातडीने आणि योग्य पद्धतीने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीची प्रशिक्षित मंडळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राज्यातील महामार्गांवर ‘हायवे मृत्युंजय देवदूत’ या उपक्रमाची योजना पोलीस दलासमोर ठेवली. शीर्षस्थ पातळीवरून तिला मंजुरी मिळाल्याने आता १ मार्च २०२१ पासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. अधिकाधिक अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे जीव वाचविणाऱ्या देवदूतांच्या कामाची नोंद करून त्यांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले पुरस्कारही दिले जाईल. या उपक्रमात आणखी काय करायला हवे, त्याला कसा प्रतिसाद आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या १५ आणि ३० तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयातून आढावा घेतला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

---

देवदूतांना मिळणार प्रशिक्षण

महामार्गावरील पेट्रोलपंप, हॉटेल्स, ढाबे तसेच मॉलमधील कर्मचारी आणि महामार्गालगतच्या गावातील सेवाभावी व्यक्ती असा प्रत्येकी ५ जणांचा ग्रुप त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून निवडला जाईल. त्यांना सरकारी, निमसरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मार्फतीने अपघातग्रस्तांना कसे हाताळायचे, कसे उचलून स्ट्रेचर, वाहनात, ॲम्बुलन्समध्ये ठेवायचे, प्रथमोपचार कसा करायचा, त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांच्याकडे प्रथमोपचाराची किट, स्ट्रेचर आणि आजूबाजूूच्या हॉस्पिटल्सची नावे, ॲम्बुलन्सचा संपर्क क्रमांक उपब्ध करून दिला जाईल. त्यांना ओळखपत्र दिले जाईल आणि मृत्युंजय देवदूत असे संबोधण्यात येईल.

----

अनेकांचे जीव वाचवू

पोलीस दलात राहून अनेक प्रशंसनीय उपक्रम राबविणारे अधिकारी म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची ओळख आहे. नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी मिशन मृत्युंजय हा उपक्रम सुरू करून सुमारे ५ हजार शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांशी जोडले होते. कारागृहात असताना त्यांनी बंदिवान रजनी हा उपक्रम सुरू करून राज्य सरकारची प्रशंसा मिळवली होती. त्यांनी कारागृहात सुरू केलेल्या योगा आणि गळाभेट उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेकांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.

---