लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.मृगनयनी म.प्र. हस्तशिल्प आणि हातमाग विकास निगम व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘मृगनयनी मध्यप्रदेश प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात मध्यप्रदेशातील पारंपरिक कलाकृतींना आकार देणाऱ्या कलावंतांचे वंशज त्यांच्या कलाकृतींसह सहभागी झाले आहेत. त्यात नवाब पतौडी यांची नात, पाकीजा चित्रपटात मीनाकुमारीने धारण केलेली चंदेरी साडी बनविणारे कलावंत, महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी प्रोत्साहन दिलेल्या माहेश्वरी कलाकृतीच्या कारागिरांचे वंशज आणि अन्य अनेक व्यक्तिगत तसेच घरादाराला सौंदर्याने नटविणाऱ्या वस्तू सादर झाल्या आहेत. त्यात हस्तकौशल्याने बनिवलेल्या बॅग, पर्स, साड्या, खेळण्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. यात ७७ कलावंत सहभागी असून, पाच-सात कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.खिरवडकर यांच्या हस्ते उद्घाटनदमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. यावेळी, मृगनयनीचे एम.एल. शर्मा उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी असणाऱ्या सर्व वस्तू या कोणत्याही मशिनरीशिवाय बनविण्यात आल्या असून, या कलाकृतींचे देश-विदेशात प्रचंड मागणी असल्याचे शर्मा यांनी सांगितले.अडीच लाखाची चंदेरी साडी
मृगनयनी प्रदर्शन : पतौडीचे वंशज, पाकीजाची कलाकृती अन् होळकरांचे कारागीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:41 IST
भारतीय पारंपरिक कलाकृतींचे वेडआज जगभरातील शौकिनांना लागले आहे. त्या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आणि त्यातील कलाकुसर कुणालाही मोहात पाडावे असेच असून, अशाच कलाकृतींचे प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू झाले आहे.
मृगनयनी प्रदर्शन : पतौडीचे वंशज, पाकीजाची कलाकृती अन् होळकरांचे कारागीर
ठळक मुद्देअॅन्टिक वस्तूंसोबतच सुरेख कलाकृतींचे प्रदर्शन ठरतेय आकर्षक