शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

२.६९ लाख ग्राहकांना महावितरणची ‘एसएमएस’ सुविधा

By admin | Published: June 15, 2017 4:24 PM

ग्राहकांना मीटर रिडिंग, वीज बिल, खंडित वीजपुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती मोबाइलवर एसएमएसव्दारे प्राप्त होत आहे.

आॅनलाईन लोकमतअमरावती : यवतमाळ व अमरावती या दोन जिल्ह्यांतील २ लाख ६९ हजार ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्याने या ग्राहकांना मीटर रिडिंग, वीज बिल, खंडित वीजपुरवठा अशा अनेक इतर वीज सेवेसंबंधीची माहिती मोबाइलवर एसएमएसव्दारे प्राप्त होत आहे.यापूर्वी ही माहिती फक्त इंग्रजी भाषेत एसएमएसव्दारे मिळायची. मात्र, महावितरणचे ग्रामीण भागातील ग्राहक लक्षात घेता आता वीज ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार इंग्रजी व मराठी भाषेत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार होताच तत्काळ संबंधित ग्राहकांच्या मोबाइलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तारीख याची माहिती मिळते. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रिडिंग अशा प्रकारची माहिती वीज ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर खंडित वीजपुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरू होण्याची वेळ याची माहितीदेखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार आहे. त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाइल अ‍ॅपद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहे. त्यामुळे ग्राहकाला देयकाचा आॅनलाइन भरणा करता येणार आहे. मोबाइल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व इतर माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे, त्यामुळे तत्पर सेवा मिळण्यास मदत होईल. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणे गरजेचे असल्याने महावितरणकडे नोदणी करावी, असे आवाहन अमरावती परिमंडळाव्दारा करण्यात आले आहे.अशी करा नोंदणीवीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये एमआरईजीएस हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा संख्येचा ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवावा याशिवाय १८००२३३३४५, १८००२००३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येईल, महावितरणचे संकेतस्थळ तसेच मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.