उमरेड : चाेरट्याने कुणाचेही लक्ष नसताना माेटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना उमरेड शहरात घडली.
श्रावण लक्ष्मणराव राऊत (४४, रा. शेडेश्वर, ता. उमरेड) यांनी त्यांच्याकडील साेन्याचे दागिने बॅंकेकडे तारण ठेवले हाेते. त्यांनी तू दागिने साेडविले आणि दागिने व राेख रक्कम एमएच-४०/एम-४७७२ क्रमांकाच्या माेटरसायकलच्या डिक्कीत ठेवले. त्यांनी ती माेटरसायकल हाॅटेलसमाेर उभी ठेवली व आत नाश्ता करायला गेले. त्याच काळात कुणाचेही लक्ष नसताना माेटरसायकलच्या डिक्कीतील १ लाख ५० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपये राेख असा एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार संजय कुळकर्णी करीत आहेत.