लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत एका महिलेची हत्या करून तिच्या अंगावरचे ३० लाखांचे सोने लुटून नागपुरात पळून आलेला आरोपी मोहम्मद अकबर अमिर बादशहा शेख (वय २२, रा. माटुंगा, मुंबई) याला मेयो चौकातील एका लॉजमध्ये अटक करण्यात आली. त्याला नागपुरात आश्रय मिळवून देणाऱ्या एका तरुणालाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन सोबत नेले. १९ मार्चला वसंता लक्ष्मीनारायण (वय ७९) नामक महिलेची हत्या करून आरोपी अकबर नागपुरात पळून आला होता. त्याने वसंता यांची हत्या केल्यानंतर ३० तोळे सोनेही लुटले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईच्या शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूरच्या तरुणासोबत तो संपर्कात असल्याचे कळाल्याने मुंबईचे पोलीस पथक गुरुवारी नागपुरात पोहचले. अकबर तसेच त्याला साथ देणाऱ्या प्रकाश गायकवाड नामक तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस मुंबईकडे रवाना झाले. त्याला पकडण्यासाठी येथील गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेतली होती.
मुंबईतील खुनी टॅक्सीचालक नागपुरात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:54 IST
मुंबईत एका महिलेची हत्या करून तिच्या अंगावरचे ३० लाखांचे सोने लुटून नागपुरात पळून आलेला आरोपी मोहम्मद अकबर अमिर बादशहा शेख (वय २२, रा. माटुंगा, मुंबई) याला मेयो चौकातील एका लॉजमध्ये अटक करण्यात आली.
मुंबईतील खुनी टॅक्सीचालक नागपुरात जेरबंद
ठळक मुद्देमहिलेची हत्या करून ३० तोळे सोने लुटले होते