लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ करण्यात आला. त्यांना प्रसूती काळातील रजा नाकारण्यात आली. तसेच अन्य महिला अधिकाऱ्यांनाही मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा अरोप करीत सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविकांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षापुढे काळे मास्क व काळा वेश परिधान करून ठिय्या आंदोलन करीत ‘मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!’ अशा आशयाचे फलक झळकावले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या महिला सेक्रेटरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. याची दखल घेत आयोगाने आयुक्त मुंढे यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. प्रसूती कालावधीत महिलांना रजा घेण्याचा अधिकार असतानाही मुंढे यांनी भानुप्रिया ठाकूर यांना रजा नाकारून त्यांना मानसिक त्रास दिला. महापालिकेत ५० टक्के महिला नगरसेविका आहेत. महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आयुक्तांनी महिलांचा सन्मान करावा, अशी भूमिका उपमहापौर मनीषा कोठे व मनपातील सत्ता पक्षाच्या प्रतोद दिव्या धुरडे यांनी मांडली. आंदोलनात नगरसेविका प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, संगीता गिऱ्हे, रिता मुळे, उषा पॅलट यांच्यासह मोठ्या प्रमाणात नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.नगरसेविका गुन्हेगार नाहीतलोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. महापालिका आयुक्तांकडून आम्हाला चांगली वागणूक मिळावी. आम्ही गुन्हेगार नाही, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नगरसेविकांनी यावेळी दिला.
मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 8:47 PM
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ करण्यात आला. त्यांना प्रसूती काळातील रजा नाकारण्यात आली. तसेच अन्य महिला अधिकाऱ्यांनाही मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा अरोप करीत सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविकांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षापुढे काळे मास्क व काळा वेश परिधान करून ठिय्या आंदोलन करीत ‘मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!’ अशा आशयाचे फलक झळकावले.
ठळक मुद्देभाजप नगरसेविकांचे आयुक्तांच्या कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन