नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत उपद्रव शोध पथकाने एकाच दिवशी ८१ जणांवर कारवाई करून ५०५००रुपयाचा दंड वसूल केला आहे.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते हे लगतच्या परिसरात अस्वच्छता करतात. अशा २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल केला आहे. चार लोकांवर रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करून ४०० रुपये दंड वसूल केला आहे. तर १२ दुकानदारांनी रस्त्यावर कचरा टाकल्याने ४८०० रुपये दंड वसूल केला आहे. मंगल कार्यालयाकडून रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई करून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूकीचा रस्ता मंडप टाकून अडविल्या प्रकरणी ५ लोकांवर कारवाई करून ११५०० रुपये दंड वसूल केला आहे. रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेत बांधकामाचा मलबा टाकल्याने ३ जणांवर कारवाई करून ११ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाईमनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या तीन आस्थापनांवर कारवाई करून १५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.