महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगल मंडपमला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम उपस्थित होते. महापौरांनी या कोविड रुग्णालयासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक मनिंदर उप्पल यांच्यासोबत चर्चा केली होती. रेल्वेतर्फे येथे विद्युत व्यवस्था, पाणी, तीन डॉक्टर्स व सहा नर्सेसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच मनपातर्फे ऑक्सिजन लाईन, ऑक्सिजन सिलेंडर, औषधी, डॉक्टर्स व नर्सेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. जैविक कचरा मनपातर्फे उचलण्यात येईल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नागपुरात अन्य कोणतेही रुग्णालय नाही. या रुग्णालयामधून गंभीर आजार नसलेल्या रुग्णांना दिलासा मिळेल. महापौरांनी मनपा प्रशासनाला रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने लवकर व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मनपा व द.पू.म. रेल्वेचे कोविड रुग्णालय उत्तर नागपूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:09 AM