लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आसीनगर झोन क्षेत्रातील काळे लॅण्ड डेव्हलपर्स यांचे नारा येथील आठ भूखंड जप्त केले तर गांधीबाग झोन क्षेत्रातील थकबाकीदारांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या.आसीनगर झोनमधील मौजा नारा, खसरा क्रमांक नऊ येथील काळे अॅण्ड डेव्हलपर्स नारा सोसायटी येथील आठ भूखंडावर ७.९६ लाखांचा कर थकीत आहे. भूखंडधारकांनी पाच दिवसात थकबाकी न भरल्यास जप्त करण्यात आलेल्या भूखंडाचा लिलाव केला जाणार आहे. ही कारवाई झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कर निरीक्षक चंद्रशेखर मोहिते व स्वप्नील वाघमारे यांनी केली.गांधीबाग झोनतर्फे जप्त व लिलाव कार्यवाही करण्यात आली. वॉर्ड क्रमांक २७ मधील लक्ष्मण महादेव ठाकरे, विष्णू वंजारी, संध्या प्रापर्टीज आणि फाय एल.टी.डी. डायरेक्टर चंद्रप्रकाश पसारी, ताराबाई गहरवार, कृष्णा इंगळे, संगीता चांदपूरकर, दत्ता शिर्के , रत्नाबाई चौव्हाण आदी मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. जप्ती व लिलावातून २ लाख ५० हजारांची वसुली करण्यात आली. ही कारवाई झोनचे सहारयक आयुक्त अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
मनपा : थकबाकीदारांच्या १७ मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 1:08 AM
मागील काही वर्षापासून मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने आसीनगर झोन क्षेत्रातील काळे लॅण्ड डेव्हलपर्स यांचे नारा येथील आठ भूखंड जप्त केले तर गांधीबाग झोन क्षेत्रातील थकबाकीदारांच्या नऊ मालमत्ता जप्त करण्यात आल्या.
ठळक मुद्देआसीनगर व गांधीबाग झोनची कारवाई