शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

मनपा  : वीजनिर्मिती नाही, पण लघुपटावर लाखोंचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:20 AM

कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे.

ठळक मुद्देकचऱ्यापासून वीजनिर्मिती : सुरू होण्यापूर्वीच प्रकल्प बारगळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारणार होती. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. १८ जुलै २०१८ रोजी सुरेश भट सभागृहात या प्रकल्पाचे डिजिटल भूमिपूजन करण्यात आले. यावेळी चलचित्र संकलन करून कचऱ्यापासून वीजनिर्मितीवर आधारित लघुटाचे डिजिटल सादरीकरण करण्यात आले होते. यावर ४ लाख १० हजार ६४० रुपये खर्च करण्यात आले. परंतु हा प्रकल्प बारगळला आहे. मात्र लघुपटावरील खर्च महापालिका आपल्या तिजोरीतून करणार आहे.भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. दररोज ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार होती. या कामाचे कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. डिसेंबर २०१९ पर्यंत हा प्रकल्प उभारला जाणार होता. यामुळे भांडेवाडी येथील कचऱ्याची समस्या मार्गी लागणार होताी. परंतु कचऱ्यापासून खतनिर्मिती व बायो-मायनिंग प्रकल्प आल्यानंतर वीजनिर्मिती प्रकल्प रोखण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले. स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पावर आधारित लघुपट निर्माते मे. राजकारणे मीडिया वेव्हज प्रा.लि. यांना ४.१० लाखांचे बिल देण्याला मंजुरी देण्यात आली.एनडीएस पथकाला मुदतवाढआरोग्य विभागातील मनुष्यबळ लक्षात घेता उपद्रव शोध पथकात (एनडीएस) कंत्राटी ८७ पदे निर्माण करण्यात आली आहेत. ११ महिन्याच्या करारावर नियुक्ती करण्याची २०१७ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. यात ४१ लष्करी जवानांची निवड करण्यात आली होती. त्यांचा कालावधी संपला असल्याने या पथकातील जवानांच्या नियुक्तीला मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.कन्हानचे पाणी गोरेवाड्यात आणणारकन्हान नदीपात्रात जून ते डिसेंबर या कालावधीत मुबलक पाणी असते. या पाण्याची रोहणा गावाजवळ उचल करून ते पेंच जलाशयातील पाण्याचे वहन करणाऱ्या २३०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाणार आहे. या कामाला गती देण्यासाठी या कामाचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे. यावर ९७ लाख ६२ हजार २१० रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाelectricityवीजGarbage Disposal Issueकचरा प्रश्न