लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.संबंधित जीर्ण इमारतीच्या आसपास राहणारे नागरिक आणि त्या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, घर जीर्ण झाल्याची माहिती झाल्यानंतरही कारवाई होत नसेल तर त्याकरिता जबाबदार कोण, असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहे. जीर्ण आणि जुन्या इमारतींना पाडण्याचे काम मनपाचे अतिक्रमणविरोधी पथक करीत असल्याचे मनपाने जारी केलेल्या बयाणात म्हटले आहे. त्यानंतरही घरमालकाला स्वत:च्या इमारतींचे वेळोवळी सुरक्षा आॅडिट करणे आवश्यक आहे. इमारतीची सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम-२६५ अंतर्गत प्रत्येक घरमालकाची आहे. त्या अंतर्गत विशेतज्ज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून तपासणी करणे अनिवार्य आहे.कोणत्याही इमारतीचा हिस्सा जीर्ण असल्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयाला देण्याचे मनपाने म्हटले आहे. मनपा संबंधित प्रकरणी घर मालकाला नोटीस देईल. त्यानंतर त्या घरी कुणी राहात असेल आणि घर पडण्याच्या घटनेत कुणी सापडत असेल तर त्याकरिता मनपा जबाबदार नाही. जीर्ण इमारतींचे निरीक्षण करून मनपाचे अधिकारी काही सूचना करतील. घराच्या जीर्ण भागाच्या दुरुस्तीसाठी मनपाची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर सुधारणा करता येईल.पाऊस सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. जन आणि धन हानी टाळण्यासाठी मदत करावी, असे मनपाने म्हटने आहे, पण जीर्ण घर पडल्यामुळे कुणी व्यक्ती जखमी वा मृत होत असेल तर मनपाची जबाबदारी काय राहील आणि दोषी घरमालकावर काय कारवाई करण्यात येईल, हे मनपाने जारी केलेल्या बयाणात सांगितलेले नाही.
घर पडल्यास मनपा जबाबदार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:03 AM
कराच्या स्वरुपात नागरिकांच्या खिशातून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचे काम मनपा करीत आहे. त्यानंतरही मनपाला नागरिकांच्या जीवाची पर्वा नाही. जीर्ण घरांच्या प्रकरणांमध्ये मनपाने कायद्याचा हवाला देत घर मालकाला घराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बाध्य केले आहे.
ठळक मुद्दे नोटीस जारी करून जबाबदारी झटकली : घरमालकाने करावे स्ट्रक्चरल ऑडिट