शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक : ४० जागांसाठी २११ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:13 PM

वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठी ७१ व नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देवानाडोंगरीत ३८ जागांसाठी १९९ तर पारशिवनीत ७१ उमेदवार रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठी ७१ व नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यातील काही उमेदवार निवडणूक रिंगणातून मागे हटण्याची शक्यता असून २ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये घमासान होणार आहे.वानाडोंगरी आणि पारशिवनी ग्रामपंचायतला दर्जा वाढ मिळाल्यानंतर १५ जुलैला पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झाला असून यामध्ये विशेषत: स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबतच माजी आमदारांना या निवडणुकीच्या निमित्ताने ताकद दाखविण्याची संधी आहे.वानाडोंगरी नगर परिषदेतील १० प्रभागातून २१ सदस्यपदासाठी १२८ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. सोबतच नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी निवडणूक रिंगणात उतरले आहे. यामध्ये सर्वाधिक ११ उमेदवार हे प्रभाग १ ब मध्ये आहे. तर सर्वात कमी ४ उमेदवार हे चार प्रभागात आहेत. यामध्ये प्रभाग २ ब, प्रभाग ३ अ, प्रभाग ५ अ, प्रभाग ७ अ चा समावेश आहे.पारशिवनी नगर पंचायतमध्ये १७ सदस्यपदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. येथे सर्वच वॉर्डात साधारणत: ३, ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. केवळ प्रभाग १५ मध्ये तब्बल १० उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज सादर केले आहे. उमेदवारी अर्ज २ जुलैपर्यंत परत घेता येणार आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. सध्यातरी सर्वच उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. वानाडोंगरी नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्टÑवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.एक दृष्टिक्षेपवानाडोंगरी नगर परिषदेत प्रभाग १ अ मधून ७ व ब मधून ११, प्रभाग २ अ मधून ६ व ब मधून ४, प्रभाग ३ अ मधून ४ व ब मधून ७, प्रभाग ४ अ मधून ५ व ब मधून ६, प्रभाग ६ अ मधून ६ व ब मधून ६, प्रभाग ७ अ मधून ४ व ब मधून ६, प्रभाग ८ अ मधून ५, ब मधून ५ व क मधून ६, प्रभाग ९ मधून ६ व ब मधून ७ तर प्रभाग १० अ मधून ८ व ब मधून ८ उमेदवारांनी अर्ज सादर केला. पारशिवनी नगर पंचायतमध्ये वॉर्ड क्र. १, २, ४, ५, ७, ११, १२, १३, १४ मधून प्रत्येकी ४, वॉर्ड क्र. ३, १६ मधून प्रत्येकी ५, ३ वॉर्ड क्र. ६, ८, ९, १०, १७ प्रत्येकी ३ तर वॉर्ड क्र. १५ मध्ये १० उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे.नगराध्यक्षपदाचे उमेदवारवानाडोंगरी नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी शीला डाखळे, वर्षा शहाकार, रचना कन्हेर, हेमलता गिरडकर, नंदा दुपारे, वंदना जोध आणि उषा बोदिले यांनी प्रत्येकी एक असे एकूण सात अर्ज सादर केले आहेत. पारशिवनीत सुनीता डोमकी, माधुरी बावनकुळे, प्रतिभा कुंभलकर यांच्यासह रुबीना बाघाडे यांनी दोन अर्ज दाखल केले. यामुळे येथे पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरElectionनिवडणूक