लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचरा संकलनाच्या करारात व्यक्तिगत पातळीवर बदल करून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहचविल्याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. आयुक्त अश्विन मुदगल यांच्या आदेशावर सामान्य प्रशासन विभागातर्फे निलंबनाचा नोटीस जारी करण्यात आला. या कारवाईमुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांमध्ये खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे आॅगस्टच्या शेवटी डॉ. गणवीर हे सेवानिवृत्त होणार होते. सन २००८ मध्ये महापालिकेने कचरा संकलनाचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला दिला. दहा वर्षांसाठी हा करार करण्यात आला. आवश्यक मंजुरीनंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दरम्यान, आरोग्य उपसंचालक डॉ. गणवीर यांनी वैयक्तिक पातळीवर करारातील अटी बदलल्या. त्यांना करारात बदल करण्याचे अधिकार होते.मात्र, त्यासाठी महापालिका आयुक्त व स्थायी समितीची संमती घेणे आवश्यक होते. मात्र, डॉ. गणवीर यांनी तशी संमती न घेता आपल्या स्तरावरच अटी बदलून त्याची अंमलबजावणी केली.महापालिकेची आर्थिक स्थिती कमजोर असताना कनकचे बिल सहा ते आठ महिने प्रलंबित होते. या काळात कंपनीने थकीत बिल देण्याची तसेच कचरा संकलनाचे दर वाढविण्याची मागणी केली. यावेळी कनकच्या जुन्या कराराची प्रत काढण्यात आली. त्यात नमूद दर व कचनला दिल्या जात असलेला मोबदला यात बरीच तफावत असल्याचे आढळून आले.संबंधित प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीमध्ये आला तेव्हा अध्यक्ष संदीप जाधव यांनी करारात बदल करणाºया अधिकाºयांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. सुमारे दीड ते दोन महिने ही फाईल रखडली. शेवटी शुक्रवारी ही फाईल उघडण्यात आली व शनिवारी डॉ. गणवीर यांना निलंबित करण्यात आले.
मनपाचे आरोग्य उपसंचालक मिलिंद गणवीर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 2:00 AM
कचरा संकलनाच्या करारात व्यक्तिगत पातळीवर बदल करून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहचविल्याप्रकरणी महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांना शनिवारी निलंबित करण्यात आले.
ठळक मुद्देकचरा संकलन करारात घोटाळा : महिनाभरात होणार होते सेवानिवृत्त