शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

महापालिकेचा दिव्याखाली अंधार !

By admin | Published: September 08, 2015 5:01 AM

रात्रीला शहरातील रस्ते प्रकाशमान करणाऱ्या पथदिव्यांच्या एका रहस्याचा भंडाफोड झाला आहे. कळत-नकळत

कमल शर्मा ल्ल नागपूररात्रीला शहरातील रस्ते प्रकाशमान करणाऱ्या पथदिव्यांच्या एका रहस्याचा भंडाफोड झाला आहे. कळत-नकळत महानगरपालिका ‘मोफत’च्या विजेवर हा झगमगाट करीत आहे. यासंबंधी वीज वितरण फे्रंचायजीने मनपा प्रशासनाला पत्र जारी करू न, त्याची माहिती दिली आहे. मात्र याविषयी कंपनीला विचारणा केली असता, ही चोरी नसून अनियमितता असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील संपूर्ण पथदिवे लावणे व त्याला वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासाठी वेगळे खांब लावले जातात, शिवाय मीटरसुद्धा स्वतंत्र असते. त्या मीटरवरील रीडिंगनुसार वीज कंपनी मनपाला बिल आकारते. परंतु शहरातील अनेक भागात यामध्ये अनियमितता होत आहे. अनेक ठिकाणी डायरेक्ट (विनामीटर) विजेचा उपयोग केला जात असल्याचे एसएनडीएलच्या चौकशीतून पुढे आले आहे. माहिती सूत्रानुसार, रस्त्यांच्या रुदीकरणानंतर अतिरिक्त लावण्यात आलेले पथदिवे थेट फेजसोबत जोडण्यात आले आहेत. यात मानेवाडा, वाठोडा, कामगारनगर, नारा व रामबाग आदी भागात असे चित्र दिसून येते. यासंबंधीच्या घटना पुढे येताच डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. एसएनडीएलने ११ ठिकाणी नवीन मीटर लावले आहेत; शिवाय ७८ खराब मीटर बदलून ७५० खांब मीटरशी जोडले आहेत.मनपाला पत्र ४वीज वितरण फ्रेंचायजी एसएनडीएलचे बिझनेस हेड जगदीश चेलारमानी यांच्या मते, यासंबंधी कंपनीने मनपाला पत्र जारी करू न त्याची माहिती दिली आहे. पथदिव्यांसाठी उपयोग होत असलेल्या विजेचे बिल तयार व्हावे, अशी कंपनीची इच्छा आहे, कारण यामुळेच वीजहानी वाढत असून, त्याचा सामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे. मात्र सध्या सुरू असलेली ही चोरी नसून अनेकदा नागरिकांच्या मागणीनुसार मनपाला अतिरिक्त वीजखांब लावावे लागत असल्याचे चेलारमानी म्हणाले. नियमांचे उल्लंघन४एसएनडीएलच्या मानेवाडा झोनमधील ५४० ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले आहे. माहिती सूत्रानुसार, एसएनडीएलतर्फे करण्यात आलेल्या चौकशीतून तीन प्रकारे वीज पुरवठा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे. यात विनामीटर पथदिव्यांना होत असलेला वीज पुरवठा, रस्त्यांवरील अर्धेच पथदिवे मीटरवर असून इतर सर्व डायरेक्ट जोडण्यात आले आहेत, तसेच काही ठिकाणी पथदिव्यांचे मीटरच जळलेले आढळून आले आहेत. हो, असे होत आहे - मनपा ४मनपाच्या वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी शहरातील पथदिव्यांबाबत असे होत असल्याचे मान्य केले. त्यांच्या मते, अनेकदा नागरिकांच्या हितासाठी स्ट्रीट लाईट फेजऐवजी दुसऱ्या फेजचा उपयोग केला जातो. परंतु मनपा डायरेक्ट लाईटचे सुद्धा शुल्क भरत असल्याचे ते म्हणाले. मोफत व चोरीतील तफावत ४जर एखादी सामान्य व्यक्ती डायरेक्ट फेजवरू न वीज पुरवठा घेत असेल, तर ती वीजचोरी म्हटल्या जाते. वीज कंपनी त्यावर धाड घालून त्या व्यक्तीला केवळ दंडच ठोकत नाही, तर गुन्हासुद्धा दाखल केल्या जातो. परंतु या प्रकरणात मनपा व एसएनडीएल काही वेगळाच विचार करीत आहे. एसएनडीएल ही अनियमितता असल्याचे सांगत आहे.