लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधाननरेंद्र मोदी शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलायावेळी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, राजेंद्र रहाटे, अविनाश बाराहाते, ए.एस.बोदिले, ए.एस.मानकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली कामे, जबाबदारी कर्तव्यभावनेतून पार पाडावी. तसेच नागरिकांनीही शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.दौºयांच्या मार्गावरील व अन्य मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे आहे. ते तातडीने बुजविण्यात यावे,शहरात कुठेही कचरा असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा विभागाची गाडी फिरवून जनावरांची व्यवस्था करण्यात यावी, मार्गात कुठेही जनावरांचा अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. अग्निशमन विभागामार्फत विमानतळ, राजभवन, मानकापूर स्टेडियम, सुभाषनगर, मुंजे चौक याठिकाणी प्रत्येकी एक गाडी सज्ज ठेवणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाद्वारे देण्यात आली.प्रारंभी अभिजित बांगर यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याची माहिती दिली. दौऱ्याच्या मार्गावरील रस्ता दुभाजकावर तातडीने रंगरंगोटी करा, विकासकामांमुळे नादुरुस्त तातडीने दुरुस्त करा, मार्गाचे विद्रुपीकरण करणारे सर्व जाहिरात फलक काढून सिग्नलची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.मेट्रो रेल्वेशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असेल त्या गोष्टींची पूर्तता करा, मानकापूर स्टेडियम येथे आवश्यक त्या प्राथमिक सेवा मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपलब्ध करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 9:14 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला.
ठळक मुद्देमहापौरांनी घेतला आढावा : सोपविलेली कामे जबाबदारीने करण्याचे निर्देश