शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

मनपा मालमत्ता करवसुली : उद्दिष्ट अवघड, अधिकारी टेन्शनमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:59 PM

आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.

ठळक मुद्दे२३ फेब्रुवारीपर्यंत फक्त २०० कोटी जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक वर्ष संपण्याला ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे. प्रयत्न करूनही मालमत्ता कराची २३ फेब्रुवारीपर्यंतची वसुली २०० कोटी आहे. आणखी जोर लावला तरी हा आकडा २५० ते २६० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी मालमत्ता करापासून २२८ कोटी जमा झाले होते. या वर्षी मालमत्ता कर विभागातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले होते. परंतु मनुष्यबळ नसल्याने अपेक्षित वसुली झाली नाही. अभिजीत बांगर यांच्या बदलीनंतर तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच मालमत्ता विभागावर वसुलीसाठी सर्वाधिक दबाव वाढल्याने अधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत.मुंढे यांनी झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. उद्दिष्टाच्या आसपास वसुली न झाल्यास झोनचे सहायक आयुक्त, कर अधीक्षक, निरीक्षक यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यामुळे कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरले आहेत. परंतु ३६ दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने उद्दिष्टाच्या आसपास वसुली होण्याची शक्यता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला करवसुलीचे विभागाने ३०० कोटींचे लक्ष्य निर्धारित केले होते. परंतु मुंढे यांनी उद्दिष्ट वाढविले. स्थायी समितीने ४५० कोटींचे उद्दिष्ट दिले होते.शिल्लक असलेल्या कालावधीत दररोज २ कोटींची वसुली झाली तरी ७२ कोटी जमा होतील. सध्या दररोज एक ते दीड कोटीची वसुली होत आहे. उद्दिष्ट पूर्ण न केल्यास आयुक्त संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.थकबाकीदारांचा प्रतिसाद नाहीमहापालिकेच्या मालमत्ता विभागाने एकूण ५१४.३८ कोटींची थकबाकी काढली आहे. चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर २३३.७३ कोटी आहे. अशा प्रकारे आर्थिक वर्षात एकूण ७४८.११ कोटींची वसुली करावयाची आहे. यातील १२९.९१ कोटीच्या थकीत प्रकरणांचा वाद न्यायालय वा प्राधिकरणात सुरू आहे. उर्वरित ६१८.२० कोटींच्या डिमांड काढण्यात आलेल्या आहेत. १ एप्रिल २०१९ ते २३ फेब्रुवारी २०२० पर्यंत मनपाने एकूण १९९.५३ कोटींची वसुली केली आहे. यातील थकबाकी ९४.३३ कोटी आहे. चालू करातून १०५.२० कोटी वसूल झाले आहेत.कारवाईने जोर पकडलामुंढे यांच्या दबावामुळे मालमत्ता विभागातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी आसीनगर झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात थकबाकीदारांच्या घरातील सोफा, फ्रीज, टीव्ही, टेबल, कूकर, असे साहित्य जप्त करण्यात आले. लॉन मालक पुरुषोत्तम शहाणे यांच्याकडे ५.८२. लाखांची थकबाकी आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई करण्यात आली. तसेच धरमपेठ झोनमध्ये ६ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. वॉशिंग मशीन, टीव्ही, जप्त करण्यात आले. तसेच थकबाकी वसूल करण्यात आली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर