- २३ इमारती रिकाम्या, ८ पाडल्या. मरणासन्न ६८ पैकी ३३ मराठी, २३ हिंदी व ९ उर्दू माध्यमाच्या.
- ८ शाळा मनपा कार्यालयासाठी. रात्रपाळीच्या शाळेसाठी ३, अन्य माध्यमांच्या शाळेत ९
- ५ शाळा खाजगी संस्थांना, ३ शाळेत व्यावसायिक काॅम्प्लेक्स. खाजगी लाेकांच्या वापरासाठी २
- वाचनालय व रुग्णालयासाठी २ शाळा, ई-लायब्ररीसाठी १ व मुक्त विद्यापीठासाठी १
- रात्र निवाऱ्यासाठी ४ शाळा. आरटीओ कार्यालय १ शाळेत.
- संघ मुख्यालय पाेलीस सुरक्षा दलासाठी १, ओसीडब्ल्यू कार्यालयासाठी १, स्मार्ट सिटी कार्यालयासाठी १
बजेट केवळ ३ टक्के, तेही जाते कुठे?
मनपाच्या बजेटपैकी केवळ ३ टक्के तरतूद शैक्षणिक कार्यासाठी. त्यातही अस्थापनेसाठी माेठ्या प्रमाणात खर्च. २०१९ मध्ये १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी ७५ लाखांचा खर्च. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी २५० रुपये. मात्र चाॅकलेट व बिस्कीटाचा पुडा मिळाल्याची माहिती. याशिवाय प्राथमिक व माध्यमिक शाळा दुरुस्ती, मासिक पुस्तिका, हस्तपुस्तिका वितरण, विद्यार्थी सुरक्षा विमा याेजना, विद्यार्थिनींसाठी सायकल बॅंक, वाचनालय व त्यांची दुरुस्ती, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, परीक्षा खर्च, शैक्षणिक उपक्रम, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा अशा अनेक कामांसाठी तरतूद दर्शविली आहे. मात्र शाळांची अवस्था बघता हा पैसा जाताे कुठे, हा प्रश्न उपस्थित हाेताे.