लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील १३ पैकी उमरेड, काटाेल, सावनेर, रामटेक, माेहपा व खापा या सहा नगर परिषदांमधील विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी साेमवारी (दि. २२) दुपारी संबंधित नगर परिषदांच्या सभागृहात विशेष सभांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात उमरेड, काटाेल, सावनेर व रामटेक नगर परिषदेत सत्तापक्षाचा बाेलबाला राहिला तर, माेहपा नगर परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची अविराेध निवड करण्यात आली.
...
उमरेडमध्ये दोन समित्या सभापतिविना
उमरेड : नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यासाठी साेमवारी विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. यात पाचपैकी शिक्षण व महिला बालकल्याण या दाेन समित्यांना सभापतीच मिळाले नाही. साेबतच आठ नगरसेवकांनी त्यांच्या समिती सदस्यपदाचे राजीनामे दिले. या प्रकारामुळे पालिकेतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले असून, राजकीय वातावरण तापले आहे.
विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. यात सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी अरुणा हजारे यांची अविरोध निवड करण्यात आली. आरोग्य समिती सभापतिपदी हरिहर लांडे तर नियोजन समितीच्या सभापतिपदी शालिनी गवळी यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे, शिक्षण तसेच महिला व बालकल्याण या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतिपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या दोन समित्या सभापतिपदापासून तूर्तास वंचित राहिल्या आहेत. पालिकेच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
...
आठ सदस्यांचे राजीनामे
या विषय समित्यांच्या सभापतिपदांसाेबतच सदस्यांचीही निवड केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या समित्यांवर गटनेत्यांमार्फत सदस्यांचे नामनिर्देशन केले जाते. या समित्यांवर असलेल्या एकूण आठ नगरसेवकांनी त्यांच्या समिती सदस्यपदाचे राजीनामे सभेपूर्वी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्याकडे सादर केले. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला हाेता. राजीनामे देणाऱ्यांमध्ये जयसिंग गेडाम, पुष्पा कारगावकर, सोनू गणवीर, अजय कोवे, रेणुका कामडी, सीमा कांढळकर, बेबी वाघमारे, श्रीकृष्ण जुगनाके या आठ नगरसेवकांचा समावेश आहे.