शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

मुन्ना - मंगल यादव गटावर दंगलीचा गुन्हा, फटाक्यांसाठी फोडली डोकी, नातेवाईक बनले शत्रू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 10:53 PM

 नागपूर - फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद करून अजनीतील परस्परविरोधी मुन्ना यादव - मंगल यादव गटाने एकमेकांचे डोके फोडले. त्यांनी केलेल्या जबर हाणामारीत एकूण सात जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गटाकडून तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी १० जणांवर दंगल तसेच प्राणघातक हल्ला चढवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.राज्य ...

 नागपूर - फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद करून अजनीतील परस्परविरोधी मुन्ना यादव - मंगल यादव गटाने एकमेकांचे डोके फोडले. त्यांनी केलेल्या जबर हाणामारीत एकूण सात जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही गटाकडून तक्रारी नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी १० जणांवर दंगल तसेच प्राणघातक हल्ला चढवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.राज्य कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव हे वर्धा मार्गावरील अजनी चौकाजवळच्या चुना भट्टी परिसरात राहतात. त्यांच्या जुन्या घराच्या बाजूलाच त्यांचे नातेवाईक असलेले मंगल यादव राहतात. ते एकमेकांचे नातेवाईक असले तरी त्यांच्यात अनेक दिवसांपासून पटत नाही. शनिवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान दोन्ही कुटुंबीयांकड भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू होता. त्यानिमित्ताने मुन्ना यांच्या करण आणि अर्जून नामक मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली. त्याला मंगल यादवच्या गटातील मुलांनी विरोध केला. त्यावरून बाचाबाची आणि आरडाओरड वाढली. पाहता पाहता मंगल यादवच्या गटातील मुलांनी करण आणि अर्जुनवर हल्ला चढवला. करण आणि अर्जुनच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानंतर मुन्ना यादव यांच्या गटातील मुलांनी मंगलच्या गटातील मुलांवर धाव घेतली. त्यानंतर जोरदार हाणामारी सुरू झाली. लाठ्या, रॉड, तलवारीचा सर्रास वापर झाल्यामुळे मुन्ना यांच्या गटातील करण, अर्जून आणि अन्य एक असे तिघे जबर जखमी झाले. तर, मंगल यादवच्या गटातील पापा यादव, करण आणि सागर यादव हे जबर जखमी झाले. हाणामारीच्या या घटनेत मध्यस्थी करायला गेलेल्या नगरसेविका लक्ष्मी यादव यांनाही दुखापत झाली. त्यानंतर घटनास्थळ परिसरात प्रचंड तणाव निर्मांण झाला. माहिती कळताच मोठा पोलीस ताफा पोहचला. दुसरीकडे दोन्ही गटातील मंडळींनी धंतोली ठाण्यात धाव घेतली. तेथेही ते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत होते. मंगल यादव गटातर्फे पापा यादवने नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मुन्ना यादव, बाला यादव, लक्ष्मी यादव, करण आणि अर्जून यादव या पाच जणांवर गुन्हे गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हल्ला करणे, शस्त्र वापरणे, आदी आरोपाखाली विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. तर, नगरसेविका तारा ओमप्रकाश यादव यांच्या तक्रारीवरून मंगल यादव, पापा यादव, गब्बर यादव, सागर आणि मंजू यादव यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. नेहमीचाच वादपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांना डोक्याला जबर दुखापत असल्यामुळे त्यांना धंतोलीच्या एका खासगी ईस्पितळात दाखल करण्यात आले असून, विरोधी गटातील पापा आणि मंजू यादव यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या दोन्ही गटात यापूर्वीही अनेकदा वाद आणि हाणामा-या झाल्या आहेत. हे वाद पोलीस ठाण्यातही पोहचले आहेत. मात्र, यावेळीची हाणामारी गंभीर आहे. विशेष म्हणजे, एका गटातील आरोपी मंगल यादव याला दोन कोटींच्या लुटमार प्रकरणी कोर्टाने काही दिवसांपूर्वीच कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला असून, आता पुन्हा त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस