शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Published: March 03, 2016 3:06 AM

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली.

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील वर्तमान राजकारण, विविध मुद्यांवरून होत असलेले वाद त्याचप्रमाणे पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर सरसंघचालकांशी चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी त्यांनी संघाच्या ज्येष्ठ प्रचारक तसेच पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.डॉ. जोशी मंगळवारी रात्रीच उपराजधानीत पोहोचले होते. सकाळी १० च्या सुमारास डॉ. जोशी महाल येथील संघ मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक होते. सरसंघचालकांशी सुमारे तासभर त्यांनी बंदद्वार चर्चा केली. डॉ. जोशी अडीच तास मुख्यालयात होते व १.४५ च्या सुमारास ते तेथून निघाले. नागपुरात त्यांचा मुक्काम एका स्थानिक हॉटेलमध्ये होता.बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी बऱ्याच काळापासून मौन साधले आहे. भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे ते सदस्य असले तरी पक्षीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून काहीसे बाजूला झाले आहे. राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे ते टाळत आहेत. परंतु संघवर्तुळात मात्र त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराला देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले होते. सध्याची एकूण राजकीय पार्श्वभूमी, भविष्यात महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका लक्षात घेता सरसंघचालकांशी त्यांची झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. (प्रतिनिधी)