खुनी हल्ला : आरोपीला तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:57 AM2019-08-17T00:57:40+5:302019-08-17T00:58:57+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने खुनी हल्ला प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला.
ओमप्रकाश सहदेव गुप्ता (३९) असे आरोपीचे नाव असून तो अभिजितनगर, नागपूर येथील रहिवासी आहे. ही घटना २० एप्रिल २०१५ रोजी रात्री ८ च्या सुमारास वाडी येथे घडली होती. भूखंड खरेदीच्या वादातून आरोपीने रामकुमार गुप्ता या मालमत्ता व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला होता. १५ जानेवारी २०१९ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत १० वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला वरीलप्रमाणे सुधारित शिक्षा सुनावली.