शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आईला मारहाण केल्याने भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 9:34 PM

Murder of brother , crime news दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या धाकट्या भावास मध्यस्थी करताना धक्का दिला. ताे सिमेंट राेडवर काेसळल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसख्ख्या भावासह मावस भाऊ अटकेत : घाेरपड शिवारातील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्ककामठी : दारू पिऊन आईला शिवीगाळ करीत मारहाण करणाऱ्या धाकट्या भावास मध्यस्थी करताना धक्का दिला. ताे सिमेंट राेडवर काेसळल्याने त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने थाेरल्या भावाने मावस भावाच्या मदतीने मृतदेह घाेरपड-शिरपूर मार्गालगतच्या शेतातील विहिरीत टाकला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी उघडकीस आली असून, पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे.

रवी गणपत कडू (३५) असे मृताचे तर सुरेश गणपत कडू (४०) व रोहित नरेश मुळे (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे तिघेही घाेरपड, ता. कामठी येथील रहिवासी आहेत. रवीला दारूचे व्यसन हाेते. दारू प्यायल्यानंतर ताेइतरांसह आईला शिवीगाळ व प्रसंगी मारहाणही करायचा. रवी शनिवारी (दि. १७) सायंकाळी दारू पिऊन घरी आला हाेता. त्याने आईला शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे सुरेशने त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत त्याचा रवीला धक्का लागला आणि ता. सिमेंट राेडवर काेसळला. त्यामुळे त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली.ताे जखमी अवस्थेत बराच वेळ घटनास्थळीच पडून राहिला. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले. त्याने पाेलिसांना सूचना देण्याऐवजी मावसभाऊ राेहितला साेबत घेऊन रवीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. मात्र, शुक्रवारी (दि. २३) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रवीचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच पाेलिसांनी सुरेश व राेहितला विश्वासात घेत विचारपूस केली. दाेघांनीही संपूर्ण घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.

मृतदेह शेतातील विहिरीत टाकला

घटनेच्या रात्री १० वाजताच्या सुमारास सुरेशने मृत रवीला त्याच्या माेटरसायकलवर बसविले. राेहितला साेबत घेऊन मृतदेह घाेरपड-शिरपूर मार्गालगतच्या प्रेमचंद शंकर खाेत, रा. घाेरपड, ता. कामठी यांच्या शेतात नेला. तिथे दाेघांनीही मृतदेहाला दाेरीने दगड बांधले व मृतदेह शेतातील विहिरीत टाकला व घरी परत आले. शुक्रवारी (दि. २३) सकाळी मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. रवीचा खून झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी तपासाची दिशा बदलविली आणि सुरेश व राेहितला चाैकशीसाठी ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू