तीन महिन्यापूर्वी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीला त्रास देऊ नको, असे सांगत या अल्पवयीन मुलाकडे अक्षरश: विनंती केली होती. परिस्थितीची जाणीव करून देऊन आपल्या मुलीच्या मार्गातून बाजूला होण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र त्यावर कसलाही परिणाम पडला नाही. तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोन महिन्यापूर्वी त्याने मुलीच्या आईला, ‘आंटी, तुम्ही पहात राहा, या दोन महिन्यात मी काय करणार आहे ते ’ अशी गंभीर धमकीही दिली होती. आज त्यानेही धमकी खरी करून दाखविली. ज्या पद्धतीने त्याने ही घटना अमलात आणली त्यावरून तो सराईत गुन्हेगार असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या वडिलांचे कोराडी मार्गावर फेब्रिकेशनचे दुकान आहे.
...
१५ दिवसापूर्वी केला होता हल्ला
या अल्पवयीन मुलाने १५ दिवसापूर्वी मुलीला बेदम मारहाण केली होती. त्यात तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. तिची ही अवस्था पाहून परिसरातील नागरिकही काळजीत पडले होते. तरीही बदनामीच्या भीतीपोटी या कुटुंबाने पोलिसात तक्रार करण्याचे टाळले. घटनेनंतर त्यांनी मुलीला मामाच्या घरी पाठविले होते. तिचा भाऊ दोन दिवसापूर्वीच परतला होता, दुर्दैवाने तो आज त्याच्या हाती लागला.
...
इन्स्टाग्रामवरून झाली होती ओळख
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची ओळख आधी अरबाज नामक युवकाशी इन्स्टाग्रामवरून झाली होती. अरबाज तिच्याशी मोबाईलवरून बोलायचा. अशातच तिची मोबाईलवरूनच या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्याने अरबाज हा चांगल्या वृत्ताीचा नसल्याने त्याच्याशी न बोलण्याचा सल्ला तिला दिला होता. यानंतर त्याने मुलीशी सलगी वाढविली. कुटुंबीयांनी विरोध करूनदेखिल अनेकदा तो चाकू घेऊन कुटुंबीयांना धमकावण्यासाठी तिच्या घरी यायचा.
...४८ तासातील दुसरी घटना
एकतर्फी प्रेमातून घडलेली ही ४८ तासातील दुसरी घटना आहे. मंगळवारी सकाळी नंदनवन येथील राजेंद्र नगरात गोंदियामधील प्रशांत बारसागड़े नामक युवकाने खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेवर प्राणघातक हल्ला केला होता. मागील अडीच वर्षापासून त्याची तिच्यासोबत मैत्री होती. परंतु कुटुंबीयांनी समजावल्यावर तिने त्याच्या मैत्री बंद केली. त्यामुळे संतापलेला प्रशांत तिची हत्या करण्यासाठी नागपुरात पोहचला आणि हा प्रकार घडला.
...