लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जाटतरोडी येथील आकाश ऊर्फ दीपक वाघमारे याला विनाकारण आपला जीव गमवावा लागला. आकाशचा गुंडांशी कुठलाही संबंध नव्हता. नशेत असलेले गुंड आकाशच्या शेजारी राहणाऱ्या युवकाला मारण्यास आले होते. ते युवकाच्या घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत असताना आकाश बाहेर आला आणि गुंडांच्या हातून आपला जीव गमावून बसला. आकाशचे मारेकरी दोन दिवसानंतरही पोलिसांच्या हाती लागले नाही.३१ डिसेंबरच्या रात्री इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाटतरोडीत २४ वर्षीय आकाश वाघमारे याची हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांमध्ये मुकुल ऊर्फ टिंक्या पडोळे, शुभम ऊर्फ सर्किट तायडे, गिरीश वासनिक व ऋषिकेश उईके याचा समावेश होता. टिंक्या व सर्किट तडीपार आरोपी आहे. आरोपींनी पहिले वस्तीतील २४ वर्षीय सूरज बारमाटे याच्यावर हल्ला केला. सूरजला वाचविताना त्याचा भाऊ शुभम, बहीण रविना व मित्र अजय विश्वकर्मा जखमी झाले. त्यानंतर आरोपी आकाशच्या घरी पोहचले. सूत्रांच्या मते आकाशच्या शेजारी राहणाऱ्या युवकासोबत आरोपींचा जुना वाद होता. आरोपी त्या युवकाची हत्याचा करण्याच्या इराद्याने आले होते. परंतु तो घरी नव्हता. आरोपींनी युवकाचे घर समजून आकाशच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आकाशच्या घरी भाऊ अक्षय व त्याची आई होती. दरवाज्याचा आवाज ऐकून आकाश घराबाहेर आला. आरोपींनी त्याला घेरून त्याला मारपीट करू लागले. दरम्यान शुभम ऊर्फ सर्किटने त्याच्या पोटात चाकू मारला. त्यामुळे किडनीला जखम झाली व आकाशचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतरही आरोपीचा अर्धा तास जाटतरोडीमध्ये आतंक सुरू होता. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लोकांनी इमामवाडा ठाण्याजवळ एकत्र येऊन जोरदार नारेबाजी केली. आकाशच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई कामाला जाते. आकाशचा भाऊसुद्धा मोलमजुरी करतो. दोघांच्याही मदतीने आई आपले घर चालवित होती. आकाशच्या मृत्यूमुळे परिसरातील लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सीपींची मोहिम ठरली निष्फळटिंक्या ऊर्फ सर्किट याला एका महिन्यापूर्वी इमामवाडा पोलिसांनी तडीपार केले होते. तरीही तडीपार गुंड शहरात सक्रिय असतात. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. बी.के. उपाध्याय यांनी तडीपार गुंडांना बाहेर हाकलण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. ठाण्याच्या निरीक्षकाला तडीपार गुंडावर सतत नजर ठेवण्याचे निर्देश दिले होेते. त्यानंतरही हत्येसारखे गुन्हे घडत आहेत, ही बाब पोलीस आयुक्तांनी गंभीरतेने घेतली आहे. गुंडाच्या मारेकऱ्यांना ७ जानेवारीपर्यंत कोठडीनवीन वर्षाचे स्वागत कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या गुंडाची हत्या करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री एमआयडीसीच्या राजीवनगर येथे गुंड रंजित ऊर्फ धानेश्वर (१९) याची हत्या करण्यात आली होती. तर त्याचा साथीदार सन्नी ऊर्फ नस्सू याला जखमी केले होते. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी सचिन काळे, गोवर्धन राऊत, नितेश काळे, उमादास लिल्हारे, मंगेश काळे व स्वप्निल काळे यांना अटक केली होती.