शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

नागपूरच्या शांतीनगरात थरार; धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रिशियनचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:00 PM

दोघांना अटक

नागपूर : शांतीनगर येथे अनैतिक संबंधातून इलेक्ट्रिशियन सुदर्शन कावळे (५०, बिनाकी ले-आउट) याची हत्या करण्यात आली. शांतीनगर पोलिसांनी हे गूढ उकलून दोन तरुणांना अटक केली आहे. शुभम (२४) आणि सचिन उर्फ भुऱ्या मदन पटले (२०, शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

सुदर्शन हा आरोपी शुभमच्या घरी राहत होता. तो अविवाहित होता. मंगळवारी रात्री म्हाडा कॉलनीजवळ त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर, पोलिसांनी चौकशीची सूत्रे हलविली. सुदर्शनचा शुभमच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याची माहिती कळाली. पोलिसांनी शुभमची चौकशी केल्यावर सत्य समोर आले. सुदर्शन १५ वर्षांपासून शुभमच्या घरी राहत होता. त्याची शुभमच्या आईवर वाईट नजर होती. त्याने त्याच्या आईशी अनैतिक संबंध ठेवल्याची चर्चा होती. ही गोष्ट कुटुंबीयांना कळल्यावर, त्यांनी सुदर्शनला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ऐकले नाही. अखेर संतापलेल्या शुभमने सुदर्शनला दम देण्याचे ठरविले. त्याने त्याचा मित्र भुऱ्याच्या मदतीने त्याला म्हाडा कॉलनीजवळ गाठले व त्याला मारहाण करायला सुरुवात केली. सुदर्शननेही जोरदार प्रतिकार केला. अखेर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली.

हत्येअगोदरही समजावले

शुभमने सुदर्शनला अगोदर असा प्रकार करू नको, असे बजावले. मात्र, सुदर्शननेही त्याचे न ऐकता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केले. तो ऐकतच नसल्याचे पाहून अखेर दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. भुऱ्यावर अगोदरही जुगार खेळण्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर