शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

पत्नी-मुलीची हत्या; पतीची आत्महत्या

By admin | Published: January 21, 2017 2:23 AM

पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली.

गोरेघाट शिवारात आढळले मृतदेह : घातपाताची शक्यता देवलापार : पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेघाट जंगलात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही हत्या अनैतिक संबंधातून करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृतदेहाच्या पाहणीनंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. पती बाळू कांतिलाल सांगोडे (३५), पत्नी रूपाली बाळू सांगोडे (३०) व मुलगी अंशू बाळू सांगोडे (अडीच वर्षे) रा. टुयापार, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. बाळू सांगोडे हा मध्य प्रदेशातील भरवेली (जिल्हा बालाघाट) येथील खाणीत आॅपरेटर म्हणून नोकरी करायचा. अंदाजे चार वर्षांपूर्वी त्याचे रूपालीसोबत लग्न झाले. रूपालीचे माहेर मौदा तालुक्यातील असून, लग्नानंतर बाळू हा खाणीच्या क्वॉर्टरमध्ये पत्नीसह राहायचा. तो पत्नी रूपाली आणि अंशुला घेऊन गुरुवारी एमपी-५०एमसी-०९९६ क्रमांकाच्या मोटरसायकलने भरवेली येथून टुयापार येथे यायला निघाता होता. गोरेघाटनजीकच्या जंगलात त्याने धारदार शस्त्राने वार करून रूपाली आणि अंशुची हत्या केली आणि झाडाला गळफास बांधून स्वत: आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, रूपाली व अंशु यांचे मृतदेह जवळजवळ होते तर बाळून झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता. जवळच मोटरसायकल, मोबाईल व कपड्यांची बॅग होती. रुपालीची मान कापलेली असून, ती केवळ मांसावर लटकलेली होती. बाळूचे हात मात्र बांधलेले होते. त्यामुळे परिसरात या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहेत. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी) २९ पानांची सुसाईड नोट मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली असून, ही २९ पानांची आहे. पत्नीचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे वारंवार खटके उडायचे. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर तीन ते चार खोल्या बदलविल्या. परंतु, ती नवीन ठिकाणी अनैतिक संबंध प्रस्थापित करायची. ही नोट हिंदीत लिहिलेली असून, त्यात तीन-चार नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मी जे काही करत आहे, ते मला काही कळत नाही. कळले तरी मी लाचार आहो. तुला मारत आहो. मला माफ कर’ असे त्याने या नोटमध्ये मुलीला उद्देशून लिहिले आहे.