लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष्ट गट पुढे सरसावला आहे. शनिवारी बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव पारित करून राहुल गांधी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.काँग्रेसमधील असंतुष्ट गटाची नगरसेवक किशोर जिचकार यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यशवंत कुंभलकर होते. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शहर महासचिव विजय बाभरे, किशोर जिचकार, हनीफ सिद्दीकी, बाबा वकील, मोहम्मद कलाम, संजय दुबे, राजेश जरगर, नीरज चौबे, दीपक कापसे आदी उपस्थित होते.महापालिका निवडणुकीला वर्ष झाल्यानंतर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना द्वेषभावनेतून शहर काँग्रेसतर्फे नोटीस बजावण्यात आली. हा प्रकार निंदनीय आहे. माजी खासदार गेव्ह आवारी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न शहर काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आला तसेच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर वारंवार आरोप केले जात आहेत. त्यामुळे नागपूर शहरात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवावयाचे असेल तर विलास मुत्तेमवार व विकास ठाकरे यांना पक्षातून बाहेर काढावे लागेल. काँग्रेसमध्ये राहून दोघेही भाजपाला बळकट करीत आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव बैठकीत घेण्यात आला.
मुत्तेमवार, ठाकरे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:50 PM
शहर काँग्रेसमधील गटबाजी शांत होण्याची चिन्हे दिसत नाही. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविल्यानतंर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवारी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आता असंतुष्ट गट पुढे सरसावला आहे. शनिवारी बैठकीत माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव पारित करून राहुल गांधी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देअसंतुष्ट गटाची मागणी : राहुल गांधी यांना लिहिले पत्र