शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

गानकोकिळा लतादीदींना संगीतमय मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:18 AM

सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देसूर सप्तकतर्फे द्विदिवसीय लता संगीत समारोह उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या स्वर्गीय सूरांपुढे नतमस्तक होऊन, या गानसरस्वतीचा ९०वा वाढदिवस जागतिक पातळीवर साजरा केला जात आहे. सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेच्या संचालिका सुचित्रा कातरकर यांच्या संकल्पनेसह पहिल्या दिवशी ‘लता तुम जिओ हजारो साल’ हा हिंदी सिनेगीतांचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी, सुचित्रासह संगीता भगत, अरुण ओझरकर, प्रतीक्षा पट्टलवार, ऋचा येनूरकर, आशिष घाटे, पद्मजा सिन्हा, डॉ. अमोल कुळकर्णी, अपूर्व मासोदकर, मुकुल पांडे या गायकांनी समरसतेने २५ रोमांचक गीते सादर केली. सुचित्राच्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतासह सुरू झालेल्या कार्यक्रमात.. ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, वादा कर ले साजना, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये, पंख होते तो उड आती रे, परबत के इस पार, क्या यहीं प्यार है, अशी सुरुवातीची गीते होती. नुकतेच निधन झालेले महान संगीतकार खय्याम यांना यावेळी ‘बाजार’ चित्रपटातील गजल ‘फिर छिडी रात फुलो की’ गाऊन स्वरश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक विजया मारोतकर यांनी केले. तर रसिले निवेदन शुभांगी रायलू यांचे होते. परिमल जोशी, गौरव टांकसाळे, रवी सातफळे, महेंद्र वाटूलकर, नंदू गोहणे, पंकज यादव, तुषार विघ्ने, विजय देशपांडे, आर्या देशपांडे, निशिकांत देशमुख यांनी सुरेल सहसंगत केली.दुसऱ्या दिवशी लतादीदींनी गायलेल्या व ‘आनंदघन’ नावाने स्वरबद्ध केलेल्या मराठी गीतांसह कवयित्री सुचित्रा कातरकर यांनी लतादीदींवर लिहिलेल्या मराठी गीतांचा ‘स्वरलते तुज मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम सादर झाला. सुचित्रासह पद्मजा सिन्हा, अरुण ओझरकर, प्रतीक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, ऋचा येनूरकर, संगीता भगत, अर्चना उचके, दीपाली पनके, अनुजा जोशी, दीपाली सप्रे, आदित्य फडके, कुमार केळकर हे गायक व गायिका सहभागी होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘गणराज रंगी नाचतो’ या प्रार्थनेवरील शुभांगी दोडके यांच्या नृत्याने झाली.त्यानंतर ‘जयदेव जयदेव जय जय शिवराया’ या शिवआरतीने मैफिलीस सुरुवात झाली. यावेळी २७ गीते सादर करण्यात आली. हृदयी जागा तू अनुरागा, मालवून टाक दीप, संधिकाली आशा, डौल मोराचा, सख्या रे घायाळ मी हरिणी, राजसा जवळी जरा बसा, या चिमण्यांनो परत फिरारे, विसरू नको श्रीरामा मला, अशा लतादीदींनी मूळ गीतांसह सुचित्राने लतादीदींवर लिहिलेल्या.. ये मोगरा फुलून, जागेपणी तुला मी, स्वतंत्र भारतास तू, हृदयी ओंकार, स्वरात लहरी, स्वरलते तुला मानाचा मुजरा या गीतांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी फडनाईक व डोके दाम्पत्य, वास्तुविशारद माधव देशपांडे, निवेदन किशोर गलांडे, मधुरिका गडकरी, सीमा जोशी, शंकर लुंगे, विजया मारोतकर, वर्षा किडे-कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरmusicसंगीत