आॅनलाईन लोकमतनागपूर : ७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले. प्रमोद वडनेरकर यांनी ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेवर लिहिलेल्या ‘जंग-ए-खिलाफत’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बुधवारी बोलत होते.रामनगरातील श्रीराम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, एअर वाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला वारंवार हे सांगण्यात आले की काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु, प्रत्यक्षात नेहरुंच्या धोरणांमुळे देशाचे नुकसान झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेचादेखील कॉंग्रेसने शासनकाळात वारंवार अपमान केला. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य नव्हे तर फाळणी दिली. फाळणीचे कटू सत्य माहिती असेलेल महात्मा गांधी, विनोबा भावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्योत्सवात कुठेच दिसले नाहीत. जवाहरलाल नेहरु यांनी देशाला तोडण्याचे काम केले. तर दुसरीकडे सरदार पटेल यांनी देशाला जोडले. गेल्या ७० वर्षापासून कॉंग्रेसने यासंदर्भात केवळ असत्याचा प्रचार केला, असा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला.‘आयसिस’ला केवळ दहशतवादी संघटना म्हणणे अयोग्य ठरेल. ती धर्मांध संघटना असून धर्माच्या आधारावर केवळ संहार करण्याचे त्यांचे धोरण आहे. आपल्या देशातील काही तरुण ‘आयसिस’कडे वळले. आपल्या देशातील मुस्लिम सहिष्णू आहेत. मात्र काही लोकांमुळे पूर्ण धर्मावर शिंतोडे उडविण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे मत विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.मुस्लिम राष्ट्रांमध्ये दहशतवादाची मूळे आहेत. जोपर्यंत त्यांच्या मानसिकतेबाबत समजणार नाही तोपर्यंत ते हिंसेच्या मार्गावर का चालतात, याचे उत्तर मिळणार नाही. दहशतवादाला दहशतीनेच उत्तर दिले जाऊ शकत नाही, असे सूर्यकांत चाफेकर म्हणाले. प्रिती वडनेरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.राहुल गांधी जातीधर्माचे राजकारण करताहेतगुजरात विधानसभा निवडणूकांमध्ये राहुल गांधी व कॉंग्रेसकडून जातीधर्माचे राजकारण करण्यात येत आहे. मात्र जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. तेथे कॉंग्रेसची ही चाल विफल ठरेल, असे इंद्रेश कुमार म्हणाले. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरातील गैरहिंदू पुस्तिकेतील स्वाक्षरीचा वादावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र राहुल गांधी यांच्या वडिलांचे नाव राजीव, आजोबांचे नाव फिरोज, फिरोज यांच्या वडिल व आजोबांचा शोध घेतला असता राहुल गांधीचा खरा धर्म कळेल, असे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले.अयोध्या ही तर रामाची ‘प्रॉपर्टी’राममंदिरावर बोलताना अयोध्या ही रामाचीच ‘प्रॉपर्टी’ असल्याचे मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. अयोध्येत रामजन्मभूमीत रामाचेच मंदिर होईल, हे मुसलमानांनीदेखील मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच मंदिर तेथेच बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील मुसलमान मोदींकडे आकर्षित होत आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:33 PM
७० वर्षांपासून कॉंग्रेसने मुस्लिमांना विकासापासून दूर ठेवत केवळ भय दाखविले व राजकीय पोळी शेकून घेतली. मात्र आता मुस्लिमांना सत्य समजत आहे. ज्या नरेंद्र मोदींबाबत कॉंग्रेसने द्वेष पसरविला त्यांच्याकडेच आता मुस्लिम आकर्षित होत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देनेहरुंनी देशाला तोडले, पटेलांनी जोडलेइंद्रेशकुमार यांचे वक्तव्य