शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुस्लिमांनी मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 1:39 AM

मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते...

ठळक मुद्देमौलाना खलिलुल रहेमान सज्जाद नोमानी : राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचा भव्य मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लिमांना नेहमीच आतंकवादी कारवायात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु मुस्लिम हे आतंकवादी नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आतंकवादी कारवाया घडविण्याचे काम करते. या षड्यंत्राविरुद्ध सावध होऊन मुस्लिम बांधवांनी आपल्यावरील अत्याचार दूर करण्यासाठी एस. सी, एस. टी, एन. टी. ओबीसी या मूलनिवासींसोबत संवाद वाढवावा, असे प्रतिपादन आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मौलाना खलिलुल रहेमान सज्जाद नोमानी यांनी केले.राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्यावतीने कस्तूरचंद पार्कच्या मैदानावर आयोजित पूर्व विदर्भस्तरीय जलस्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम होते. व्यासपीठावर जागतिक लिंगायत परिषद कर्नाटकचे कोरणेश्वर स्वामी, माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी प्रा. विलास खरात, सुखदेव जानोरकर, गुरुद्वाराचे पूर्व प्रधान मलकित सिंग बल उपस्थित होते. नोमानी म्हणाले, भारतात अत्याचाराने सीमा गाठली आहे. मुस्लिमांनी केवळ नमाज न पढता समाजातील अत्याचार झालेल्यांशी नाते जोडण्याची गरज आहे. माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ म्हणाले, आयबी ही गुप्तचर संघटना ब्राह्मणांनी काबीज केली असून हेमंत करकरे यांनी मालेगावच्या स्फोटात हिंदू संघटना असल्याची बाब उघडकीस आणली. परंतु करकरेंनाच संपविण्याचे काम या हिंदू संघटनांनी केले. मलकित सिंग बल म्हणाले, देशाला अंतर्गत शक्तींपासून धोका आहे. सर्व धर्मांना एकमेकांशी लढवत ठेऊन आपला स्वार्थ साधणाºयांविरुद्ध सावध होण्याची गरज आहे. कोरणेश्वर स्वामी यांनी ब्राह्मणांनी लिंगायत धर्मावर अत्याचार केल्यामुळे वेगळा धर्म स्थापन करण्यात आल्याचे सांगून सर्वांना ब्राह्मणवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले. प्रा. विलास खरात यांनी त्रस्त लोकांना एकत्र करण्याचे काम राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे करण्यात येत असल्याचे सांगितले.सुखदेव जानोरकर यांनी लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नसताना हा कोणता विकास आहे, असा प्रश्न उपस्थित केला. भोपाळच्या भिक्खूणी संघमित्रा यांनी राष्ट्रीय एकता जोपासून देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आवाहन केले. अकिल मिर्झा यांनी अत्याचार करणाºयांना रोखण्याचे आवाहन केले.हमीमुल्ला कासीम यांनी मुलनिवासींना वेगवेगळे करून देशा बाहेरील लोक सत्ता भोगत असल्याचे सांगितले. डॉ. वंदना बेंजामीन यांनी एकता हाच एकमेव पर्याय असून प्रत्येकाने संविधानानुसार वाटचाल करण्याचे आवाहन केले. आभार रहमत अली यांनी मानले.एससी, एसटीला हिंदू समजू नका : वामन मेश्रामअनुसूचित जाती, जमातीला ब्राह्मणांनी स्पर्शही न करता येणारी जमात म्हणून घोषित केले. तरीही मुस्लिम बांधव आदिवासी, एससी समाजाला हिंदू समजतात. साडेतीन टक्के ब्राह्मणात इतरांचा समावेश झाल्यामुळे ब्राह्मणांची संख्या ७८ टक्के झाली असून ते बहुसंख्य होऊन इतरांवर राज्य करीत आहेत. प्रत्यक्षात पंतप्रधानच काय तर गावचा सरपंच होण्याची त्यांची पात्रता नाही. मोदींनी ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती बंद करून त्यांच्यावर अन्याय केला. आम्ही मुस्लिमांसोबत मिळून याविरुद्ध लढाई लढवू इच्छित आहोत. मूलनिवासींना सहा हजार जातीत विभागणाºया ब्राह्मणांपासून सावध होऊन मुस्लिमांनी काँग्रेस, भाजपाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध करण्याचे आवाहन मेश्राम यांनी केले.