शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तीन महिन्याचे व्याज भरावेच लागणार!; कर्जदारांना जागरूक करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:36 PM

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे हप्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट देण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसक्तीच्या कर्जवसुलीवर पतसंस्थांना बॅन 

मोरेश्वर मानापुरेनागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांचे हप्ते भरण्यापासून कर्जदारांना सूट देण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तीन महिन्यांचे मुद्दल आणि व्याजही भरावे लागणार नाही, असा लोकांमध्ये समज आहे. पण असे नसून तीन महिन्यांचे हप्ते पुढे ढकलण्यात आले असून त्या तीन महिन्यांचे व्याज ग्राहकांना भरावेच लागणार आहे.आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पगारदार वर्गाने कर्जाचे मासिक हप्ते भरावेच आणि तसे पत्र बँका, खासगी बँका आणि पतसंस्थांना द्यावे, असे आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी लोकमतशी चर्चेदरम्यान सांगितले. ते म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी कोरोनामुळे उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद असलेले उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा केली आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बँकांनी कर्जदारांकडून मासिक हप्ते वसूल न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तीन महिन्यांचे हप्ते रद्द होणार नसून पुढे ढकलण्यात येणार आहेत. जर कुणाला मासिक हप्ते नियमित भरायचे असतील तर त्यांना बँकेला पत्र देऊन सूचना करायची आहे. यामध्ये कुणीही संभ्रम बाळगू नये, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेप्रमाणे राज्य शासनाने सहकारी पतसंस्थांसाठी कुठलेही आदेश काढले नाहीत. ज्यांना मासिक हप्ते भरायचे आहेत, त्यांनी भरावे, अन्यथा न भरल्यास तीन महिन्यांच्या कालावधीचे व्याज पुढे कर्जदाराला द्यावे लागणार आहे. यात चक्रवाढ व्याज लागणार नाही. चक्रवाढ व्याज आकारणाºया पतसंस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले. पतसंस्थांसाठी सहा महिन्यांचा एनपीएचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी पुढे अर्थात नऊ महिने केल्यामुळे या कालावधीत पतसंस्थांना कोणतीही तरतूद करावी लागणार नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या दृष्टीने पतसंस्थांना जबरदस्तीची भूमिका घेता येणार नाही. याबाबतची माहिती पतसंस्थांना देण्यासाठी आणि कर्जदारांना जागरूक करण्यासाठी पतसंस्था फेडरेशनतर्फे पत्र आणि पतसंस्थांसाठी लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.पतसंस्थांनी सक्तीची वसुली करू नयेएनपीएच्या वाढीव मुदतीसह कर्जाचे हप्ते तीन महिने पुढे ढकलले आहेत. पण तीन महिन्यांचे व्याज कर्जदाराला भरावेच लागेल. अशा संकटसमयी पतसंस्थांनी कर्जदारांकडून सक्तीची वसुली करू नये. जे इच्छुक असतील त्यांनी कर्जाचे हप्ते भरावेत. या संदर्भात परिपत्रक काढण्यात येणार आहे.अजय कडू, उपनिबंधक, नागपूर जिल्हा.

 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक