मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:24 PM2018-02-09T22:24:43+5:302018-02-09T22:26:22+5:30

आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Muttemwar- Thakare behaving hated: Angered by Gave Awari | मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

मुत्तेमवार- ठाकरे द्वेषपूर्ण वागताहेत : गेव्ह आवारी यांची नाराजी

Next
ठळक मुद्दे नागपुरात संघटनात्मक निवडणुका होतील

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणाने सिद्ध झाले आहे, अशी नाराजी माजी खासदार गेव्ह आवारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून मुत्तेमवार- ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे शहरात काँग्रेसचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी मुत्तेमवार-ठाकरे समर्थकांनी देवडिया काँग्रेस भवनात बैठक घेत आवारी यांनीच १९९७ च्या महापालिका निवडणुकीत ‘पंजा’ गोठवून काँग्रेस बुडविल्याचा आरोप करीत ते चतुर्वेदींच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसमध्ये ‘लेटरवॉर’ भडकले असून गटबाजी टोकाला गेल्याचे चित्र निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुत्तेमवार समर्थकांनी केलेल्या आरोपांचे आवारी यांनी लोकमतशी बोलताना खंडन केले. आवारी म्हणाले, माझ्याबाबत अशा प्रतिक्रिया वाचून दु:ख झाले.
यावरून मुत्तेमवार व ठाकरे हे कसे काँग्रेस चालवित आहेत, हे सिद्ध होते. आपण उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला मुत्तेमवार- ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. माझ्यावर पंजा गोठवल्याचा आरोप करून ते मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करू पाहत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीची कुठलीही बैठक अद्याप झालेली नाही. सर्व कमिट्या सध्या हंगामी आहेत. त्यामुळे आपल्याला प्रदेशच्या बैठकीला बोलविण्याचा प्रश्नच येत नाही. नागपुरातून एवढे वर्षे खासदार राहिलेल्या मुत्तेमवार यांना नागपूरच्या बाहेरून प्रदेश काँग्रेसवर प्रतिनिधी म्हणून जाण्याची वेळ आली. त्यांनी यावर आत्मपरीक्षण करावे. मी भगोडा नाही. त्यामुळे नागपूर सोडून प्रदेशवर गेलो नाही, अशी टीकाही आवारी यांनी केली.
हायकमांडने नागपुरात संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुत्तेमवार-ठाकरे यांची सदस्य नोंदणी कमी झाल्यामुळे ते निवडणूक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदस्य नोंदणीच्या आधारे निवडणूक व्हावी किंवा नियुक्ती करावी, अशी मागणी आपण यापूर्वीच हायकमांडकडे केली होती, असेही आवारी यांनी सांगितले.
पंजा गोठवण्याचा निर्णय तत्कालीन हायकमांडचा
 १९९७ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ‘पंजा’ चिन्ह गोठविण्यात आले, याबाबत आवारी म्हणाले, ही वास्तविकता आहे. मात्र, पंजा गोठवणे हा तत्कालीन प्रदेश हायकमांडचा निर्णय होता. हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. मी फक्त शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो एवढेच. त्यावेळी सर्वांनी आपली बाजू मांडली व त्यानंतर तसा निर्णय घेण्यात आला होता. उलट त्यावेळी विकास ठाकरे यांना अभ्यंकर नगर वॉर्डातून महापालिकेचे तिकीट मिळावे म्हणून माझा तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांच्याशी वादही झाला होता. मात्र, दुर्दैवाने ठाकरे यांना विसर पडला आहे. पंजा गोठवण्याएवढा मी ताकदवार असतो तर मी मुत्तेमवार यांना नागपुरात तिकीटच मिळू दिले नसते. मला बदनाम करण्यासाठी हे असे आरोप करवून घेतले जात आहेत, असेही आवारी म्हणाले.

Web Title: Muttemwar- Thakare behaving hated: Angered by Gave Awari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.