लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : संयुक्त मालकी असलेल्या एकाच शेतजमिनीची दाेन वेगवेगळ्या व्यक्तींना परस्पर विक्री करीत ४२ लाख २४ हजार ६६० रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. यात खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यात दाेन महिलांचाही समावेश आहे.
रुमाजी बारमाटी, रा. खापरी यांची नांदा (ता. कामठी) शिवारात ४.०७ हेक्टर आर शेतजमीन असून, सातबारावर अन्य दाेन महिलांची नावे असल्याने ती शेतजमीन संयुक्त मालकीची आहे. या जमिनीच्या विक्रीबाबत रुमाजी बारमाटी यांनी व साैरभ हेमराज बाेरा (४७, रा. मुंबई) यांच्यात १५ नाेव्हेंबर २०१० राेजी करारनामा झाला. त्याचे नाेंदणीकृत आममुख्त्यारपत्रही तयार करण्यात आले.
पुढे ही शेतजमीन रुमाजी बारमाटी यांनी संयुक्त मालकी हक्कदारांच्या संमतीने मनाेहर साेनटक्के, किशाेर गुरारीकर, टी. कृष्णा माेहनराव, तिघेही रा. काेराडी, ता. कामठी, निशांत चाैधरी, रा. नागपूर यांना खरेदी करून दिल्याची तक्रार साैरभ बाेरा यांनी पाेलिसात दाखल केली. या व्यवहारात रुमाजी बारमाटी यांनी ४२ लाख २४ हजार ६६० रुपयांनी फसवणूक केल्याचे तसेच याबाबत आपण रुमाजी बारमाटी यांना विचारणा केली असता, त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले.
याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी साैरभ बाेरा यांच्या तक्रारीवरून रुमाजी बारमाटी, मनाेहर साेनटक्के, किशाेर गुरारीकर, निशांत चाैधरी, टी. कृष्णा माेहनराव यांच्यासह अन्य दाेन महिलांच्या विराेधात भादंवि ४२०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अंधारे करीत आहेत.
...
काेतवाल डुंगाची शेतजमीन
संयुक्त मालकी असलेली ती शेतजमीन काेतवाल डुंगाची असल्याची माहिती तसेच तशी कागदाेपत्री नाेंद असल्याची पाेलिसांनी दिली. ती जमीन वर्ग-२ मध्ये असल्याने विक्री हाेत नाही. त्यामुळे संयुक्त मालकी हक्कदारांनी ती शेतजमीन आधी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित केली आणि नंतर विकायला काढली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती शेतजमीन साैरभ बाेरा यांना विक्रणे क्रमप्राप्त असताना मालकांनी ती दुसऱ्याला विकली.