शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

माझी कन्या भाग्यश्री योजना : पैसे आले, पण खातेच उघडले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:19 PM

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून १२९ अर्ज प्राप्त झाले. त्यासाठी शासनाक डून ३९ लाख रुपये प्राप्त झाले. परंतु अर्जदारांपैकी एकानेही बँकेत खाते उघडले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ चा लाभ मिळू शकलेला नाही.समाजाने आधुनिकतेचा पेहरावा पांघरला असला तरी, वंशाचा दिव्यासाठी आग्रह आजही कायम आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्माचे दर फार कमी आहे. हे प्रमाण दिवसेदिवस कमी होत असून अत्यंत चिंताजनक आहे. मुलींच्या जन्माचा दर वाढावा म्हणून शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. याच उपक्रमातंर्गत ‘माझी कन्या भागश्री’ ही योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत एका मुलीनंतर जर कोणत्या कुटुंबाने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या शाखेत ५० हजार रूपयांचा फिक्स डिपॉझिट केले जाते. जर दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रूपयांचे फिक्स डिपॉझिट केले जाते. ही रक्कम राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करुन दिली जाते. सहा-सहा वर्षांनंतर लाभार्थी त्या रकमेच्या व्याजाची उचलही करू शकतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जर त्या दहावी पास आहेत व त्यांचे लग्न झाले नाही तर त्यांना जमा रक्कम व व्याजाची रक्कम एकत्र बँकेतून मिळते. एखादा पालक जर गरीब आहे तर या रकमेमुळे मुलीच्या लग्नाची त्याची चिंता मिटू शकते. याच दृष्टीकोनातून शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरूवात १ एप्रिल २०१६ पासून राज्य शासनाने केली. तसेच १ आॅगस्ट २०१७ पासून सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुरूवात झाली. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाला यासंदर्भात विचारणा केली असता १२९ अर्ज आलेले आहेत. ते शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र शासनाकडून सदर लाभार्थी मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिटमध्ये जमा करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात दिरंगाई झाली. परंतु निधी मिळाल्यानंतरही लाभार्थ्यांनी मुलींच्या नावाचे खाते बँकेत उघडलेच नसल्याने प्रशासनाला लाभार्थ्यांचा निधी त्यांच्या खात्यात जमा करता आला नाही. बँकेशी करणार करारया योजनेसाठी आता ३९ लाखांचा निधी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे बँकेशी करार करून लाभार्थ्यांची खाते उघडण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Social welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालयGovernmentसरकार