शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:39 AM

राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी ही मोहीम प्रभावी राबवावी, अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहेत. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे. ग्रामीणमधील बाधितांच्या संख्येने १० हजाराचा आकडा गाठला आहे.या मोहिमेतून शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.प्रशासनाला सूचनामोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आले आहेत. त्यात एक आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेट देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचा ताप मोजतील. ‘कोमॉर्बिड’ आहे का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ २ कमी अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठवण्याचा सल्ला देतील. कोमॉर्बिड रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करतील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देतील. त्यानुसार कामकाज चालेल. कोमॉर्बिड रुग्णासाठी औषधांचा साठा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र कार्यरत करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करावी. तिथे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे आदी या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य