शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:31 AM

नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे.

ठळक मुद्दे४६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू शहरात ७१४, ग्रामीणमध्ये १०८ नवीन पॉझिटिव्ह मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. रविवारी संक्रमितांची संख्या २०,४३९ झाली. आतापर्यंत ७३० मृत्यू झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात २३ दिवसात सातत्याने कोरोनाचे आकडे वाढतच आहेत. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण १५,०४७ संक्रमित आढळले, यातील ६०४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पण नागपुरात रिकव्हरी रेट सुधारत आहे. एकूण संक्रमितांपैकी ११,०५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रिकव्हरी रेट ५४.०७ टक्के झाला आहे. आठवडाभरापूर्वी हा रेट ४४ टक्क्यांवर आला होता. नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळला होता.

मार्च महिन्यात १६ संक्रमित होते. ५ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूची संख्या वाढतच गेली.३१ जुलैपर्यंत नागपुरात ५,३९२ संक्रमित होते व १२६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. यात ३,४७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचे संक्रमण व मृतांची आकडेवारी वेगाने वाढली. २० ऑगस्टनंतर रविवार २३ ऑगस्ट रोजी पुन्हा ४६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील ४२, ग्रामीणचे २ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात ८२४ पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यात शहरातील ७१४ व ग्रामीणचे १०८ व जिल्ह्याबाहेरील २ आहेत. रविवारी ८१४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ११,०५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी ४०१ अ‍ॅन्टिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. २९१ खासगी लॅबमधून, नीरीच्या लॅबमधून ४५, मेयोतून ८६, एम्सच्या लॅबमधून १ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गेल्या २४ तासात ५,१३९ नमुने तपासण्यात आले.

१२ दिवसात मिळाले १० हजार नवीन रुग्णजिल्ह्यात ११ ऑगस्ट रोजी संक्रमिताचा आकडा १०,३६१ होता. ३७२ मृत्यू झाले होते. अवघ्या १२ दिवसात १० हजार नवीन पॉझिटिव्ह वाढले. विशेष म्हणजे पहिल्या १० हजाराचा आकडा गाठायला १५४ दिवस लागले होते.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस