नागपूर : आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा देशातील सर्व नागरिकांना एका सूत्रात जोडतो. हिमालयाचे शिखर असो किंवा विश्वचषक, जेव्हा जेव्हा विजय मिळतो तेव्हा तिरंगा फडकतो. या तिरंगा ध्वजाकडे पाहून प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरून येते. आपण एका गौरवशाली देशाचे नागरिक आहो, याची तिरंग्याकडे पाहूनच जाणीव होते. देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान असो किंवा खेळाच्या मैदानात देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, सर्वच जण तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी प्राणदेखील पणाला लावतात. परंतु देशात बहुतांश नागरिकांना केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीसारख्याच राष्ट्रीय पर्वाला किंवा क्रिकेटचा सामना जिंकल्यावरच तिरंग्याची आठवण येते. यामुळे सहजपणे मनात हा विचार येतो की ही गर्वाची खूण नेहमी आपल्या सोबत रहावी, असे का होऊ नये. ‘लोकमत’ समूहाने या दिशेने पुढाकार घेतला आहे. समूहाने नागपूर शहरातील प्रत्येक घर, कार्यालय आणि शाळेत तिरंगा लावण्यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने व्यापक मोहीम चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी व नागपूरकरांनी देशात स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित करावी यासाठी समूहाच्या या मोहिमेत तुम्हालादेखील जोडण्याचा संकल्प केला आहे. लोकमत समूहाची ही इच्छा आहे की या मोहिमेला वाचकांकडून दिलेले नावच देण्यात यावे. प्रत्येक घर, कार्यालय व शाळेत तिरंगा फडकविण्याच्या या मोहिमेचे नाव काय असावे, हे आपणदेखील सुचवू शकता. जर तुम्ही सुचविलेले नाव निवडण्यात आले, तर तुमचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येईल. बस यासाठी तुमच्या आवडीचे नाव आम्हाला ‘ई-मेल’च्या माध्यमातून पाठवा.
माझा तिरंगा होणार माझी ओळख
By admin | Published: February 17, 2016 2:55 AM