माझी शाळा, संस्कार शाळा : शाळा संस्काराचे ज्ञानपीठ. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा. मित्र, मैत्रिणींना भेटण्याचा ! उन्हाळ्याच्या सुट्यानंतर सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी अशी जय्यत तयारी केली होती. लोकमतच्या वतीने जगनाडे चौकातील केशवनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना नवीन सत्र यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.
माझी शाळा, संस्कार शाळा :
By admin | Published: June 28, 2016 2:26 AM