यातील वैद्यकीय लक्षणे अत्यंत स्पष्ट असतात, जे अनुभवी व्यक्तीच्या डाेळ्यातून वाचू शकत नाही. मात्र सर्वात माेठे आव्हान याचे लवकर निदान हाेणे आणि त्वरित उपचार सुरू हाेणे, हे आहे. क्लिनिकल तपासणीनंतर पेरेनेसल सायनस, ऑर्बिट आणि मेंदूचे सीटी स्कॅन किंवा एमआरआय आणि नाक व कानाची तपासणी तसेच गळ्याचे तज्ज्ञ तपासणीत मदत करतात.
म्यूकोरमायकोसिसपासून वाचण्याचे उपाय?
सार्स-काेव्ह-२ संक्रमणापासून वाचण्याचे पूर्ण प्रयत्न करा. ते डबल मास्किंग आणि काेराेना विरुद्धच्या याेग्य लसीकरणाने शक्य आहे. रुग्णालयात भरती रुग्णांसाठी स्टेराॅईडचा उपयाेग केवळ काेराेना विषाणू संक्रमणासंबंधी गंभीर इन्फ्लेमेटरी रिस्पाॅन्सला नियंत्रित करण्यासाठी केला जाताे. काही संक्रमित रुग्णांमध्ये डायबिटीज अनियंत्रित असते किंवा स्टेराॅईडमुळे त्यांच्यात रक्तशर्करा वाढताे. डायबिटीजचा उपचार इन्सुलिनने करणे आणि स्टेराॅईडचा वापर केवळ आठवड्यातून एकदा आणि अतिशय कमी डाेसवर आणणे महत्त्वाचे आहे. आराेग्य सेवा देणाऱ्यांनी रुग्णालयात भरती रुग्णांच्या औषधांसह दैनिक आधारावर पडताळणी करणे आवश्यक आहे. रक्तशर्करा सामान्य ठेवणे आणि स्टेराॅईडचे डाेस नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. अधिक काळासाठी ॲन्टीबायाेटिक्स घेणे टाळायला हवे. विशेषत: प्राेफिलेक्टिक थेरेपी तर टाळायलाच हवी.
म्यूकोरमायकोसिसवर उपचार कसा करायचा?
म्यूकोरमायकोसिसचे निदान झाल्यानंतर स्टेराॅईड आणि शक्तिशाली ॲन्टीबायाेटिक्स देणे टाळले जाते. ब्लडशुगरचा स्तर नियंत्रित केला जाताे. नाक व नाकपुड्यातील फंगस ईएनटी सर्जनद्वारे सर्जिकल डेब्रिडेमेंट पद्धतीने हटविले जाते. डाेळ्यापर्यंत फंगस गेला असेल तर पापण्या काढाव्या लागतात. मेंदूपर्यंत ब्लॅक फंगस पसरले असेल तर न्यूराेसर्जरी करणे गरजेचे असते.
काेणत्या औषधांचा हाेताे वापर?
एमफोटेरेसिन बी सारखी ॲन्टीफंगल औषधे किंवा त्याच्या लिसाेसम फाॅर्म्सला महत्त्व दिले जाते. ते नसांद्वारे दिले जाते आणि साईड इफेक्ट हाेण्याचा धाेका असल्याने तज्ज्ञांचे निरीक्षण असणे आवश्यक असते. काही प्रकरणात पाेसेकेनेजाेर आणि इव्हेक्यूनेजाेल दिली जाते. ही सर्व औषधे महागडी आहेत आणि काही महिन्यांपर्यंत द्यावी लागतात.
उपचार केला नाही तर...?
या फंगल इन्फेक्शनवर उपचार केला नाही तर ताे डाेळ्यांपर्यंत पसरून अंधत्व येण्याची, मेंदूपर्यंत पसरल्यास गुंतागुंतीसह वेळेपूर्वी मृत्यू येण्याचे कारण ठरू शकते. अनेक प्रकरणात तर पाेट आणि किडनीमध्येही इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले आहे.